नाशिक : शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांची रेकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद जबीउद्दीन ऊर्फ अबू जुंदालचा जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के .के .तंत्रपाळे यांनी शुक्रवारी नामंजूर केला़ तसेच न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीदरम्यान आवश्यकता वाटल्यास जुंदालला हजर करण्याचे आदेश न्यायालय देणार असून, त्याच्या फेरतपासणी अर्जावर १३ आॅक्टोबरला निर्णय होण्याची शक्यता आहे़ आंतरराष्ट्रीय दहशतवादी अबू जुंदाल, हिमायत बेग व शेख लालबाबा ऊर्फ बिलाल यांच्यावर नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांच्या रेकी प्रकरणी गुन्हा दाखल असून, हा खटला नाशिकच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे़ न्यायालयीन कामकाज आपल्या प्रत्यक्ष हजेरीत करावे, तसेच या खटल्याची फेरतपासणी करावी, असा अर्ज अॅड़ बिपीन पांडे यांच्यामार्फत जुंदालने न्यायालयास दिलेला आहे़ मात्र जुंदालच्या जिवाला धोका असल्याने त्यास न्यायालयात हजर करणे धोक्याचे असल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयातील युक्तिवादात सांगितले आहे़
दहशतवादी जुंदालचा जामीन अर्ज नामंजूर
By admin | Published: October 10, 2014 11:09 PM