शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

जम्मू-काश्मीरची शेकडो टुर्स रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:56 AM

नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून चालणाºया अर्थकारणामुळे दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेदेखील पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देपर्यटनावर परिणाम : व्यावसायिक पाठ फिरवण्याच्या तयारीत

संजय पाठक ।नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून चालणाºया अर्थकारणामुळे दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेदेखील पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे जाणाºया पर्यटकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. मार्चपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. केवळ पर्यटनाबरोबरच आता हनिमून पॅकेजेसदेखील सुरू असतात. परंतु दहशतवादी घटना वाढत चालल्या असून, त्यातच पुलवामामध्ये मोठा हल्ला झाल्यानंतर पर्यटनक्षेत्र हादरले आहे. बहुतांशी पॅकेजेस पर्यटकांनीच रद्द केले असून, टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यादेखील सहली रद्द करीत आहेत. देशावर इतका मोठा हल्ला होत असेल तर तेथेच पर्यटनासाठी जाण्याची आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असे टुर्स कंपन्यांनी सांगितले. (पान ७ वर)जम्मू-काश्मीरला पर्याय म्हणून हिमाचल प्रदेश, सीमला, उटी, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटकांना पाठविले जात असून, हा भाग त्या तुलनेत सुरक्षित असल्याने पर्यटकांनाही त्याच पॅकेजमध्ये कमी-अधिक दर करून जाण्यास तयार होत आहेत. पर्यटनच थांबल्याने त्याचा मोठा फटका काश्मिरी नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.मुंबईतून अनेक टुर्स व्यावसायिकांनी काश्मीरच्या सहली रद्द केल्या आहेत. माझ्याकडे हनिमून कपलसह तीन अलीकडेच नोंदविल्या गेलेल्या सहली रद्द झाल्या आहे. पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यामुळे ते टुर रद्द करीत आहेत. त्याचप्रमाणे टुर्स व्यावसायिकांकडे कोणी हट्ट केल्यास संबंधितांना जोखमीवर जावे लागेल, असेही सांगत आहेत. कारण पर्यटक अडकल्यास त्यांना परत आणणे ही फार मोठी जोखीम आहे.- दीपाली वागळे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, मुंबईपर्यटनातून मिळणारा पैसा कश्मीरच्या विकासापेक्षा दहशतवाद्यांना मदतीसाठी होत असल्याची सध्या वॉट््सअ‍ॅप चर्चा सुरू असून, त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी यापुढे काश्मीरला टुर्स नेऊच नये, असे आवाहनदेखील सुरू केले आहे. त्यामुळे व्यावसायिकदेखील स्वेच्छेने टुर्स रद्द करीत आहेत.- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक