पंचवटी : खून प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केलेला सराईत गुन्हेगार जयेश दिवे हा इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवर्स इमारतीच्या छतावरून खाली फटाके फेकून जल्लोष साजरा करीत असताना त्यास जाब विचारणाºया पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फटाक्यासारखे ज्वालाग्रही पदार्थ बाळगून मानवी जीवितास धोका होईल असे वर्तन केल्याप्रकरणी संशयित दिवेसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये दोघा महिलांचाही समावेश आहे. न्यायालयाने या संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़पंचवटीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक गिरमे यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार खून, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिवेला गेल्यावर्षी खून प्रकरणात अटक केल्याने तो न्यायालयीन कोठडीत नाशिकरोड कारागृहात होता़ त्यास न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिवे राहत असलेल्या इमारतीवरून फटाके फोडून जल्लोष साजरा करीत होता़ याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचारी पाठवून खात्री करण्यास सांगितले़ त्यानुसार पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले व जाब विचारताच दिवे याने तुम्हाला काय अधिकार आहे? असे म्हणून दीपक गिरमे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करीत नंतर बघून घेतो अशी धमकी दिली़ यानंतर न्यायालयाच्या नावाने शिवीगाळ करीत गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा आणला.या प्रकरणी पोलिसांनी संशयित जयेश दिवे, विक्की ठाकूर, भूषण चौधरी, गणेश परदेशी, अक्षय बोराडे, मयूर खैर, मेहुणी प्रियंका शेख, सासू विजया खरात यांना अटक केली आहे, तर आकाश जाधव, नकुल परदेशी व किरण भडांगे हे फरार झाले आहेत़ दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या या संशयितांची पंचवटी कारंजा, इंद्रकुंड परिसरातून धिंड काढून त्यांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला़
जामिनावर मुक्ततेचा जल्लोष अन् पोलिसांच्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:23 AM
खून प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केलेला सराईत गुन्हेगार जयेश दिवे हा इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवर्स इमारतीच्या छतावरून खाली फटाके फेकून जल्लोष साजरा करीत असताना त्यास जाब विचारणाºया पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फटाक्यासारखे ज्वालाग्रही पदार्थ बाळगून मानवी जीवितास धोका होईल असे वर्तन केल्याप्रकरणी संशयित दिवेसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये दोघा महिलांचाही समावेश आहे. न्यायालयाने या संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
ठळक मुद्देसराईत गुन्हेगार : पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की