शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मºहळ येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:53 PM

सिन्नर : तालुक्यातील मºहळ येथील जामनदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारा जेसीबीची तोडफोड करण्यात आल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

सिन्नर : तालुक्यातील मºहळ येथील जामनदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारा जेसीबीची तोडफोड करण्यात आल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.गेल्या अनेक दिवसांपासून मºहळ येथील जामनदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला जात आहे. या ठिकाणी वाळू माफियांनी हजारो ब्रास वाळू वाहून नेल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करुनही त्याचा उपयोग नसल्याने काही तरुणांनी नदीतून वाळू उपसा होऊ नये यासाठी राखण करण्यास सुरवात केली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वीस ते तीस तरुणांना नदीपात्रात वाळूच्या ट्रक व जेसीबी आढळून आले. युवक नदीपात्रात येताच वाळूच्या ट्रक पसार झाल्या. तर नदी पात्रात वाळू काढणारा जेसीबी येथील ग्रामस्थांनी ताब्यात घेतला. याबाबत महसूल व पोलीस यांना माहिती देऊनही कोणीही न आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.सुमारे दोन तास वाट पाहूनही कोणीही या ठिकाणी पोहचत नसल्याने जेसीबीची फोडतोड करण्यात आल्याचे समजते. उशिराने पोलीस या ठिकाणी पोहचले. ग्रामस्थ सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पोहचले तर पोलीस कर्मचाºयांनी नदीपात्रातला जेसीबी नदीच्या बाहेर काढल्याने या ठिकाणी आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले. उशीराने तलाठी एच. एच. रितपुरे या ठिकाणी पोहचल्यानंतर पंचनामा केला व पोलिसांना कळवून जेसीबी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समजते.याठिकाणाहून सुमारे दोन हजार ब्रास वाळू उपसा झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. वाळू माफियांना स्थानिकांची मदत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाStrikeसंप