शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
2
बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
3
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
4
आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील
5
जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा
6
सलमान खानच्या घरी येणार नवा पाहुणा? अरबाजची दुसरी पत्नी शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा
7
मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
8
शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी
9
‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश
10
शिक्षक भरती घोटाळा: मुख्याध्यापकाने पाठवलेला प्रस्ताव झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती
11
Viral Video: कारच्या डिक्कीतून बाहेर लटकला हात; रील करण्याचे कारण तपासातून आले समोर
12
पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे
13
अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
14
विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!
15
चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान
16
न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई!
17
राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर
18
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
19
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
20
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

सिन्नरला जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:42 IST

नगर परिषदेच्या वतीने सरदवाडी रस्त्यावरील गंगोत्रीनगरमधील सरदवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर साकारण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

सिन्नर : येथील नगर परिषदेच्या वतीने सरदवाडी रस्त्यावरील गंगोत्रीनगरमधील सरदवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर साकारण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.सहा मीटर रूंदीच्या या ट्रॅकच्या भूमिगत गटारीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ठिकठिकाणी चेंबरही उभारण्यात आले आहे. या चेंबरच्या लेव्हलची माहिती घेत टॅकवर चालण्यास त्यातून अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार वाजे यांनी केल्या. पावसाळा सुरू असल्याने मुरूम पसरविण्यास इतर कामे बंद आहेत. या परिसराला ग्रीन बोल्ट म्हणून सुशोभित करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सांगितले.ट्रॅकच्या उभारणीमुळे ज्येष्ठ नागरिकांसह व्यायामासाठी व फिरण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक सोमनाथ पावसे, गोविंद लोखंडे, श्रीकांत जाधव, निरूपमा शिंदे, गीता वरंदळ, ज्योती वामने, तुषार लोखंडे, रावसाहेब आढाव, वसंत गोसावी, पोपट माळी, उदय कुलकर्णी, रवि आरोटे, दत्ता ढमाले, लक्ष्मण सांगळे, बाळासाहेब झोळेकर, सूर्यभान सदगीर, बाबूराव विसे, मनोज शिंदे, गणेश खापरे परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडा