लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणसिन्नर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी नारायण गडाख, संध्या गडाख, बाळासाहेब सदगीर, प्रशांत हेकरे, सुधाकर कोकाटे यांना गौरविण्यात आले. बाळासाहेब सदगीर यांनी प्रास्ताविक केले. क्लबचे अध्यक्ष महेश बोºहाडे, रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरचे संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे, सोमनाथ वाघ कार्यक्रमास उपस्थित होते.एसपीएच विद्यालय, मालेगावमालेगाव येथील एसपीएच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष निकम होते. यावेळी पर्यवेक्षक एन. जे. निकम व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राचार्य निकम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील कोकणी यांनी केले तर आभार सोपान पाटील यांनी मानले.आरबीएच कन्या विद्यालयमालेगाव कॅम्प येथील आर. बी. एच. कन्या विद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या अलका जोंधळे होत्या. प्राचार्या जोंधळे, ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका व्ही. के. अहिरे यांच्या हस्ते प्राचार्य जोंधळे यांचा सत्कारकरण्यात आला. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक राजेंद्र पाटील, पर्यवेक्षिका के. डी. पवार, एस. एस. वाघ उपस्थित होते. सूत्रसंचालन माधवी नेरकर यांनी केले.मराठी अध्यापक विद्यालयमालेगाव : कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळेत शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. सोनवणे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राचार्य सोनवणे व डॉ. कविता पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती सीमा जाधव यांनी केले तर आभार प्रा. पी.इ. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मानसिन्नर येथील आयडीबीआय बँकेने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान केला. आयडीबीआय बँकेचे शाखाप्रमुख अमर कुमार व उपप्रमुख प्रियंका बच्छाव यांनी पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी. देशमुख, उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर.टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, श्रीमती सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे तसेच चंद्रकांत घरटे यांचा सन्मान केला. शिक्षक हेच खरे देशाचे शिल्पकारआहेत राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांचा वाटा मोठा असतो शिक्षकांचा मानसन्मान ठेवणे आवश्यक आहे. अशा भावना अमरकुमार यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रियंका बच्छाव, नारायण कुंभार, सचिन ठाकूर, सचिव सुनील उगले, सुधीर शिंदे, अंजली, प्रमोद आदी उपस्थित होते.
आॅनलाइन शिक्षकदिन साजरानायगाव : निफाड तालुक्यातील साने गुरुजी शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आॅनलाइन शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन पद्धतीने शिक्षकदिन आपापल्या घरातूनच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विभागप्रमुख एस. एम. भाटजिरे यांनी आपल्या घरांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनंदा बोºहाडे होत्या. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. शिक्षक उगले यांनी प्रास्ताविक केले.