शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अवघ्या नऊ महिन्यांत तुकाराम मुंढे पर्वाची अखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:22 AM

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्त आणि कायदेशीर कामकाजाविषयी सर्वसामान्य सुखावत असले तरी त्यांची निर्णय आणि कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत गेल्याने त्यांचे चांगले निर्णय झाकोळत गेले.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्त आणि कायदेशीर कामकाजाविषयी सर्वसामान्य सुखावत असले तरी त्यांची निर्णय आणि कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत गेल्याने त्यांचे चांगले निर्णय झाकोळत गेले. विशेषत: लोकनियुक्त संस्था असताना सत्तारूढ भाजपालाच डावलले जात असल्याने सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी अवस्था नगरसेवकांची झाली. त्यातून मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यास परावृत्त करण्यात आल्यानंतर आयुक्तांच्या वादग्रस्त निर्णयामुळे लोकरोषाचा सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला फटका बसल्यास जबाबदार धरू नका, असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंढे यांच्या बदलीचा निर्णय घ्यावा लागल्याचे वृत्त आहे.  राज्यशासनाच्या निर्णयामुळे नाशिक महापालिकेत मुंढे पर्वाची नऊ महिन्यात अखेर झाली आहे.नवी मुंबई आणि पीएमटी येथे वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंढे हे नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्यात नाशिक महापालिकेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच दणका देण्यास सुरुवात केली. नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अडीचशे कोटी रुपयांच्या रस्त्याचा विषय रद्द करण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली. करवाढ करण्यासाठी महासभेत त्यांनी भाजपाला भाग पाडले. नंतर सत्तारूढ गटाने चूक दुरुस्त करून १८ टक्के करवाढ केली खरी; परंतु त्यानंतर मात्र सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांचे व त्यांचे खटके पडणे नित्याचेच झाले. यापूर्वीच्या आयुक्तांनी मंजूर केलेले आणि अगदी वर्कआॅर्डर काढण्याच्या कार्यवाहीत आलेली अनेक कामे आयुक्तांनी रद्द केली. नगरसेवकांनी सुचवलेली कामे रद्द करण्यात आली तसेच नगरसेवक निधी रद्द करण्यात आल्यानेदेखील वाद वाढत गेला. शहरात काम करताना नागरिकांच्या गरजेनुसार करावी लागत असली तरी आयुक्तांनी मात्र त्यासाठी नियम दाखवले आणि त्याचप्रमाणे कामाचे प्राधान्य, तांत्रिक व्यवहार्यता तसेच निधीची तरतूद अशा त्रिसूत्रीला प्राधान्य दिले. त्यामुळेदेखील नगरसेवकांची नाराजी ओढवून घेतली. वार्षिक भाडेमूल्यात वाढ करण्याचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला आणि त्यामुळे तर शहरात शेतकऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात मेळावे घेतले. त्यात भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनादेखील सहभागी व्हावे लागले. महासभेने संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेऊनही त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी केली नाही. तर ५० टक्के दर कमी केले. करवाढीमुळे शहर उद्ध्वस्त होईल, असा आरोप मुंढे यांच्यावर झाला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने मुंढे यांच्याविषयी तक्रारी करण्यात आल्या. परंतु फडणवीस यांनी कधी भाजपाच्या पदाधिकाºयांना तर कधी तुकाराम मुंढे यांना सबुरीचा सल्ला देत वेळ काढला. अखेरीस भाजपाच्या आमदारांसह सर्वच पदाधिकाºयांनी लोकांची कामे होत नसतील आणि आयुक्त अप्रिय निर्णय घेत असतील तर पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेदेखील मध्यंतरी कळविल्यानंतर मुंढे यांच्या बदलीच्या हालचाली गतिमान झाल्या आणि अखेरीस मुंढे यांच्या बदलीची फाईल फिरवणे सुरू झाले. मुंढे यांच्या ऐवजी नाशिकच्या आयुक्तपदासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी तसेच शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नावाची चर्चा होती. तथापि अखेरीस राधाकृष्ण गमे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.बदलीच्या चर्चेने वातावरण ढवळलेमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविषयी यापूर्वीपासूनच चर्चा सुरू होती. ईदची सुटी असतानाच आयुक्तांची बदलीची वार्ता शहरात वाºयासारखी पसरली आणि त्यातून सोशल मीडियावर भरभरून मत प्रदशर््िात केले जाऊ लागले. त्यात संमिश्र मते व्यक्त करण्यात आली.आयुक्तांची बदली कोणी केली?महापालिका आयुक्तांची बदली कोणी केली यावरूनही आता श्रेय आणि अपश्रेयाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीनेदेखील तुकाराम मुंढे यांची हुकूमशाही आणि मनमानी बघता बदली करावी, अशी मागणी केली होती, त्यानुसार कार्यवाही झाल्याचे समितीने म्हटले आहे.मुंढे यांच्या बदलीबाबत भाजपाचे मौनआयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर शहरात जोरदार उलटसुलट चर्चा सुरू असतानाच सत्तारूढ भाजपाने मात्र मौन बाळगले आहे. मुंढे यांना बदलीपत्र प्राप्त झाल्यानंतरच भूमिका मांडू, असे पदाधिकाºयांनी सांगितले.मुंढे आणि सत्तारूढ भाजपा यांचे सूर सुरुवातीपासूनच जुळत नव्हते त्या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्या विरोधात पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. अखेरीस नऊ महिन्यांतच मुंढे यांची बदली झाली. तथापि, याबाबत महापालिकेतील भाजपा पदाधिकाºयांनी मौन बाळगले.गुरुवारी (दि.२२) याबाबत पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका स्पष्ट करू, असे पदाधिकाºयांनी सांगितले.या कार्यपद्धतीमुळे अडचणीतलोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच निर्णयप्रत्येक कामाला त्रिसूत्री, नगरसेवकांच्या कामाला कात्रीआमदार निधीचा वापर स्वेच्छेने करण्यास मनाईवार्षिक भाडेमूल्यात वाढ केल्याने घरपट्टीचा वाढला बोजाराजकीय नेते, आमदारांनी घेतलेल्या मनपाच्या मिळकती सील किंवा बाजारमूल्याप्रमाणे भाडे आकारणी१३४ आंगणवाड्या बंद, मानधनावरील कर्मचारी हटविलेबस सेवेसाठी परिवहन समितीऐवजी कंपनीमखमलाबाद येथे नगर रचना योजना राबविण्यास शेतकºयांचा विरोधसिडकोत अतिक्रमण हटविण्याची भूमिका (न्यायालयामुळे माघार)गणेश उत्सवासाठी भालेकर मैदान नाकारणेसंत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याला सुविधा नाकारणेअधिकाºयांचे निलंबन, चौकशा आणि बडतर्फीबेकायदेशीर बांधकाम करणाºया मिळकतींचा शोधकालिदास कलामंदिराची भाडेवाढअन्य मनपा आणि शासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करणेगंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणात न्यायालय अवमान प्रकरणअभियंता रवि पाटील यांचे बेपत्ता होणे तसेच सहायक अधीक्षक धारणकर यांची आत्महत्यालोकाहिताचे हे घेतले धाडसी निर्णयई कनेक्ट अ‍ॅपमुळे नागरी समस्यांची तत्काळ सोडवणूकनागरिकांची गरज बघूनच कामांचा निर्णयतक्रारींच्या सोडवणूकीसाठी वॉक विथ कमिश्नरचा उपक्रममहापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ, ११८ कोटी रुपयांची एकरकमी परतफेडघरपट्टी थकविणाºया बड्या धेंडांना आणि संस्थांना दणकाशहरात समान पाणीपुरवठ्यासाठी प्रथमच जलवाहिन्यांची ऐतिहासिक कामेमलवाहिकांची मोठ्या प्रमाणात कामेरखडलेल्या प्रसाधनगृहांचे काम, ई टॉयलेट्सची कामेदिव्यांगांसाठी सुविधांबरोबरच भत्तानगररचनात बिल्डर्स ऐवजी मूळ मालकालाच टीडीआरछोटी उद्याने रद्द, सहा थीम गार्डनमहापालिका प्रशासनाला गतिमान करीत फेररचना५५ सेवा अ‍ॅपद्वारे उपलब्धविधवा, परितक्त्या, अनाथांसाठी मदतीची योजनाखेळाडूंसाठी मदतीची योजना

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे