शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

प्रस्ताव येण्यापूर्वीच बारगळला अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 1:06 AM

करवाढीमुळे टीकेचे धनी ठरलेल्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करकपातीची केलेली खेळी भाजपा पदाधिकाऱ्यांवर मात करणारी ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश महापौरांना दिले

नाशिक : करवाढीमुळे टीकेचे धनी ठरलेल्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करकपातीची केलेली खेळी भाजपा पदाधिकाऱ्यांवर मात करणारी ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश महापौरांना दिले असून, त्यानुसार प्रस्ताव मागे घेत असल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी शुक्रवारी (दि. ३१) केली. त्यामुळे शनिवारी अविश्वास ठरावावर चर्चा होण्याच्या आतच हा प्रस्ताव बारगळला आहे.  गेल्या सोमवारी (दि. २७) स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर शनिवारी (दि. १ सप्टें.) त्यावर महापौर रंजना भानसी यांनी विशेष सभा बोलविली आहे. मात्र, तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा दट्ट्या दिल्याने आता प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की भाजपावर आली आहे. गेल्या सात दिवसांपासून शहरात अविश्वास ठरावामुळे वातावरण ढवळून निघाले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च २०१८ रोजी अधिसूचना काढून वार्षिक भाडेमूल्य घोषित केले त्याचबरोबर मोकळ्या भूखंडावर-देखील करवाढ केली होती. या अवास्तव करवाढीच्या विरोधात शहरात आंदोलने सुरू झाली आणि त्यात विरोधकांबरोबरच भाजपाचे पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते. मुंढे यांच्याकडून लोकप्रतिनिधींची केली जाणारी उपेक्षा, नगरसेवकांची भेट  नाकारणे, कामे रद्द करणे या सर्व प्रकारांमुळे आधीच मुंढे यांच्या विरोधात गेलेल्या नगरसेवकांना करवाढ हे निमित्त मिळाले आणि स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांच्या सह्यांनिशी हा अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. मुंढे यांच्या समर्थनार्थ काही सेवाभावी संस्था पुढे आल्या. यानंतर ठराव मांडणाºया भाजपानेदेखील विविध संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी व्यूहरचना केली होती. सोशल मीडियावरही मुंढे यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू झाली होती. मुंढे यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय मांडण्यात आला होता.  शहरात निर्माण झालेल्या वातावरणामुळे दोन दिवसांपासून राजकीय घडामोडी होत होत्या. भाजपातील एक गट मुंढे यांच्या समर्थनासाठी होताच; परंतु खुद्द स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी अविश्वास प्रस्तावावरील सही नाकारली होती. भाजपाच्या बेबनावामुळे विरोधी पक्षांनीदेखील सबुरीची भूमिका घेतली. सभागृहातील १२२ नगरसेवकांपैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी पाच अष्टमांश म्हणजेच ७७ नगरसेवकांची गरज होती; मात्र भाजपाच्या ६५ नगरसेवकांची एकजूट होत नसल्याचे बघितल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रत्यक्ष सभागृहात भूमिका मांडू अशी सावध भूमिका घेतली. दोन दिवसांपूर्वी मुंबईला गेल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.पक्षादेशानुसार कार्यवाहीनागरिकांवर करवाढ लादली जाऊ नये यासाठी भाजपाने आयुक्तांवर अविश्वास ठराव आणला होता. मात्र, आयुक्त दोन पाऊल मागे आले. त्यांनी पन्नास टक्के कर कमी केले. त्यामुळे आम्हीदेखील दोन पाऊले मागे आलो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या पक्षादेशानुसार अविश्वास प्रस्ताव मागे घेणार आहे.  - रंजना भानसी, महापौरस्थानिक पदाधिकाºयांची खरडपट्टीभाजपाअंतर्गत तक्रारीतून एका गटाने अविश्वास ठराव कसा चुकीचा आहे, हे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पटवून दिले. त्यातच मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमुळे आयुक्त तुकाराम मुंढे बॅकफूटवर आले आणि करवाढीवर ठाम राहणाºया आयुक्तांनी मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द केली.तसेच इतर करवाढ ५० टक्के केली. त्यामुळे नागरिकांचा कल मुंढे यांच्याकडे वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी स्थानिक भाजपा पदाधिकाºयांची खरडपट्टी काढत महापौर रंजना भानसी यांना दूरध्वनी करून अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे