मुंबई नाका पोलिसांनी भारतनगर परिसरात कारवाई करून आसिफ दस्तगीर बागवान (४०) व गणेश एकनाथ डिंडे (सर्व रा. भारतनगर) या दोघांना पकडले. हे दोघेही बुधवारी (दि. ३०) दुपारी भारतनगर परिसरात आढळून आले.
दोघांनी त्यांच्याकडील मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून तरुणांना जुगार खेळण्यासाठी ३६ रुपयांत आयडी व पासवर्ड देत असताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७०० रुपये रोख व ३ हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच गंगापूर पोलिसांनी परवेझ ऊर्फ सोनू जावेद मनियार (१९, रा. शिवाजीनगर), लकी आहेर ऊर्फ भारत वसंत आहेर (रा. दिंडोरी रोड), विशाल आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पोलिसांनी परवेझला अटक केली आहे. संशयित ऑनलाईन पद्धतीने रोलेट खेळताना व खेळवताना आढळून आले होते. त्यांच्याकडून ३५० रुपये व १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.