नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र महिन्यापासून बंद असल्याने रुग्णांची उपचाराअभावी हेडसांळ होत असल्याची तक्र ार सरपंच जयश्री लाठे यांनी गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. जातेगाव, वसंतनगर, चंदनपुरी या गावांची एकूण लोकसंख्या सुमारे बारा हजार असून, जातेगाव उपकेंद्राला कुसुमतेल, ढेकू खुर्द व बुदु्रक ही गावे जोडण्यात आली आहेत. येथील परिचारिका योगीता डोंगरे यांची तालुक्यातील वेहेळगाव केंद्रात बदली झाल्याने त्यांच्या जागी बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका कविता राठोड यांची येथे बदली करण्यात आलेली आहे; परंतु राठोड या महिन्यातील ठरावीक दिवसच उपकेंद्रात हजेरी लावतात. गरोदर माता व बाळांना लस देण्यासाठी केंद्राचे कुलूप उघडतात व लसीकरणाचे काम आटोपल्यानंतर लगेच निघून जातात. येथे पिंपरखेड आरोग्य केंद्राच्या परिचारिका एस. के. बच्छाव यासुद्धा कार्यरत होत्या; परंतु त्या पुन्हा पिंपरखेड येथे रु जू झाल्याने येथील उपकेंद्र महिन्यापासून बंद आहे.
जातेगाव उपकेंद्र बंद; रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:21 AM