लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : येथे रेल्वे आणि खरेदी- विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या कांदा शीतगृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० जुलै रोजी होत आहे. राज्यातील अशा स्वरूपाचे हे पहिलेच शीतगृह असेल. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवारी दि. ३० जुलै रोजी दुपारी एक वाजता होणाऱ्या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख , जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरीश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत. रेल्वेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून (सीएसआर) पाच कोटींची मदत करण्यात आली असून गरज भासल्यास अधिकचा निधीही देण्याची तयारी रेल्वेने दर्शविली आहे. या कोल्ड स्टोरेजची क्षमता २ हजार मेट्रिक टनांहून अधिक असेल्याचेही पाटील यांनी सांगितले.
कांदा शीतगृहाचे रविवारी लासलगाव येथे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:07 AM