येवला : कृषी महाविद्यालय बाभूळगाव ता. येवला यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यनुभव अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती परीक्षण, कीड व रोग यांचे एकत्रित व्यवथापन व संगोपन आणि शेतकºयाच्या शेती विषयक विविध समस्या त्यांवरील उपाय आधी विषयांचे सखोल विश्लेषण करून शेतकऱ्यांना ह्या कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांकडून मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.कृषीदूतांमध्ये प्रामुख्याने अभिजित भड, धनंजय निकम, गौरव थोरात, ऋ षिकेश दरेकर, अनिकेत बोरस्ते, अक्षय बागल, विवेक भगरे, सुरज तिडके, गोरख कोल्हे यांचा समावेश आहे.या प्रसंगी खेडलेझुंगेचे सरपंच सुषमा गीते, उपसरपंच मनीषा सदाफळ, ग्रामसेवक सी. जे. जाधव, तलाठी एल. डि. शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब केदारे, पोलिस पाटील गोविंद आव्हाड आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी कृषी दूतांचे स्वागत केले.(फोटो २० येवला)
खेडलेझुंगे येथे बळीराज्याच्या मदतीला कृषिदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 6:04 PM
येवला : कृषी महाविद्यालय बाभूळगाव ता. येवला यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यनुभव अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती परीक्षण, कीड व रोग यांचे एकत्रित व्यवथापन व संगोपन आणि शेतकºयाच्या शेती विषयक विविध समस्या त्यांवरील उपाय आधी विषयांचे सखोल विश्लेषण करून शेतकऱ्यांना ह्या कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांकडून मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना ह्या कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांकडून मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.