शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

निफाड येथील न्यायालय परिसरात बहरला कदंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:01 AM

लासलगाव : निफाड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कदंब वृक्षावर डेरेदार कदंब फुले बहरली असून, पाढऱ्या रंगाची चेंडूसारखी गोलाकार दिसणारी ही आकर्षक फुले पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. मोठ्या प्रमाणात बहरलेल्या या फुलांमुळे कदंब वृक्षाने बहुरंगी टोकदार फुलांंची जणूकाही दुलई पांघरल्याचा भास पाहणाऱ्यांना होतो.

ठळक मुद्देडेरेदार वृक्षाने पांघरली बहुरंगी आकर्षक फुलांची दुलई; वातावरणात पसरले चैतन्य

शेखर देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : निफाड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कदंब वृक्षावर डेरेदार कदंब फुले बहरली असून, पाढऱ्या रंगाची चेंडूसारखी गोलाकार दिसणारी ही आकर्षक फुले पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. मोठ्या प्रमाणात बहरलेल्या या फुलांमुळे कदंब वृक्षाने बहुरंगी टोकदार फुलांंची जणूकाही दुलई पांघरल्याचा भास पाहणाऱ्यांना होतो.भाद्रपदच्या अखेरपर्यंत या फुलांचा बहर असतो. त्यानंतर फुलांचे फळामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होते. फुलांचा सुगंध परिसरात दरवळत असल्याने वातावरण चैतन्यदायी बनले आहे. आयुर्वेदात या फुलांचे गुण सांगितले आहे. पुराणातही या वृक्षाची महती दिसून येते. निफाड येथील न्यायालयाबाहेरील या बहुरंगी वृक्षांमुळे वेगळीच झळाली प्राप्त झाली आहे. काही कालावधीतच त्यांचे फळांमध्ये रूपांतर होते.फळांचा गुच्छही आकर्षक असतो असे जाणकारांनी सांगितले. आकर्षक बहुगुणी कदंबकदंब वृक्ष भारतात विविध राज्यांमधील जंगलात आढळतो. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष बहरलेला दिसतो. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत कदंब वाढतो. पावसाळ्यात कदंबचा फुलोरा लक्षवेधी ठरतो. पावसाळ्यात अन्य प्रजातीचा फुलोरा नाहीसा झालेला असतो, तेव्हा मधमाशांसारख्या किटकांना कदंबपुष्पांचा आधार असतो. जुले-आॅगस्टमध्ये या झाडाला फुले येतात. शहरासह जिल्ह्यात कदंब वृक्ष चांगल्या संख्येने पहावयास मिळतात. हा वृक्ष दीर्घायुषी प्रकारात मोडतो. फुलांप्रमाणे पानेदेखील तितकेच आकर्षक करणारे असतात. पश्चिम बंगाल राज्यात तर भाद्रपद महिन्याच्या एकादशीला शेतकºयांमध्ये ‘कदंब उत्सव’ साजरा करण्याची प्रथा आहे. कदंब वृक्ष पोटाच्या तक्र ारींवर तसेच सर्दी-खोकल्यावर गुणकारी ठरतो. कदंबाच्या फळांचा रस तसेच खोडाच्या सालीचा काढा औषध म्हणून घेतला जातो. आयुर्वेदात या वृक्षाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कदंब हा शततारका नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला जातो.निफाड येथील न्यायालयात दररोज हजारो पक्षकार व शेकडो वकील खटल्याच्या निमित्ताने येत असतात. या कदंब वृक्षाची घनदाट सावली अनेकांचा आधार बनते. कमालीचा थंडावा येथे मिळतो. साधारणात: मार्चमध्ये या कदंब वृक्षाची पाने गळून जातात. गेल्या काही दिवसांपासून हा वृक्ष फुलांनीबहरला आहे.