पालखेड बंधारा येथील कादवा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०१९ आणि २०२० या वर्षातील वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेल्यांची नावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, सरचिटणीस विठ्ठल संधान यांनी जाहीर केली आहेत. २०१९ मधील काव्यसंग्रहासाठी देण्यात येणारा स्व. इंदूबाई व त्र्यंबकराव गणपतराव संधान मायबाप पुरस्कार प्रा. साईनाथ पाचारणे आणि डाॅ. विशाल इंगोले यांना विभागून देण्यात आला आहे. स्व. विनोदी साहित्य सम्राट चंद्रकांत महामिने उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार डाॅ. भीमराव वाघचौरे तर मुरलीधर राघो चौधरी उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार डाॅ. प्रभाकर शेळके यांना जाहीर झाला आहे.
बाल साहित्यासाठीचा स्व. चिंतामण शंकर उगलमुगले पुरस्कार विठ्ठल जाधव यांना तर गुरुमाउली वाङ्मय पुरस्कार डाॅ. उर्मिला चाकूरकर यांना जाहीर झाला आहे. तर २०२० च्या पुरस्कारार्थींमध्ये डाॅ. शिवाजी शिंदे आणि निशा डांगे, डाॅ. विद्याधर बन्सोड, संजय मोहल्ले, डाॅ. फुला बागुल, डाॅ. कैलास दौंड, लतिका चौधरी, प्रा. आशा व्ही. पाटील यांचा समावेश आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ऑक्टोबर २०२१ मध्ये
नाशिक येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे मिठे व संधान यांनी कळविले आहे.