दिंडोरी : तालुक्यातील बी.के. कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजारामनगर येथील विद्यार्थ्यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिन व मराठी पंधरवाडा निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना तब्बल एक हजार फुट लांबीचे शुभेच्छा पत्र देण्याचा अनोखा उपक्र म राबविला होता. त्या पत्राची तावडे यांनी दखल घेत मुख्याध्यापक लक्ष्मण महाडिक यांना खास ईमेल करून या स्तुत्य उपक्र माचे कौतुक केले आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विशेष उपक्र म राबविण्याचे आवाहन करीत या मराठी लोकोउत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभारही व्यक्त केले आहे, अशी माहिती पत्रलेखन प्रकल्पाचे आयोजक सुरेश सलादे यानी दिली. महाराष्ट्र शासन शालेय विभागाच्यावतीने कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात येते . तसेच मराठी भाषा पंधरवडा विविध कार्यक्र मांचे आयोजन करीत साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनानुसार विद्यालयाने विविधकार्यक्र मांचे आयोजन केले होते.मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक विभागाच्यावतीने इयत्ता पाचवी ते नववी या वर्गातील एक हजार विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक फुटाचे शुभेच्छा पत्र लिहून एकत्रित करून जोडली तर ते एक हजार फुटांचे शुभेच्छा महाडिक यांनी तावडे यांना दिले. प्राचार्य महाडिक यांनी शिक्षण विभागाला हे महाकाय पत्र पाठविले. या हजार फुटांच्या अखंड पत्राची दखल दस्तुरखुद तावडे यांनी घेऊन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्र माचे कौतुक केले व त्यांनी बी के कावळे विद्यालयास ई मेल व महाडिक यांच्या पत्त्यावर पाठविले.त्या पत्रात तावडे यांनी म्हटले की हा उपक्र म हाती घेऊन आपण शासनास आपण केलेल्या कामाबद्दल अभिनंदन करीत आभार मानले. मराठी भाषा विकासासाठी आपण विविध प्रकारचे प्रचार व प्रसाराचे उपक्र म राबवावे असे आवाहन त्यांनी केले आहे .आमच्या विद्यालयात लेखन वाचन या उपक्र मांतर्गत हा उपक्र म राबविण्यात आला मोबाईल व इतर अनेक संपर्क साधनांमुळे आजकाल स्वहस्ते पत्र लेखन केवळ अपवादानेच होते याचा विचार करीत विद्यार्थीं याना सहभागी करून घेत हा आगळा वेगळा उपक्र म हाती घेण्यात आला त्यास नामदार तावडे सो यांनीच दस्तुरखुद्द दखल घेतल्याने आता आमचा उत्साह वाढला आहेसुरेश सलादेशिक्षक कादवा
कादवा विद्यालयाच्या पत्रलेखनाचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:55 PM