नाशिक : सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील रघुनाथ व ताईबाई जगताप या दांपत्याचे स्मारक सिन्नर तालुक्यातील कोनांबे या त्यांच्या मूळगावी साकारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण नुकतेच पार पडले. आंबेडकर चळवळीचे अभ्यासक आणि लोख पुंडलिक निरभवणे यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कस्तुरबाई निरभवणे व उद्योजक तुकाराम जगताप उपस्थित होते. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून उपेक्षितांची अस्मिता जागृत करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक हजार नागरिक सत्याग्रहींनी नावे नोंदवली. त्यात जगताप दांपत्याचा समावेश होता असे निरभवणे यांनी यावेळी सांगितले. निवृत्त शिक्षिका सुजाता जगताप यांनी श्वशुर रघुनाथ जगताप यांच्या आठवणी सांगितल्या. तुकाराम जगताप, प्रा. डी. एम. जगताप, जया पवार यांनी मनोगत व्यक्त केले. रतन गांगुर्डे यांच्या बुद्ध वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. सूत्रसंचालन अनिता अहिरे यांनी केले. साजन जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास रमेश शिरसाट, श्रीनिवास पाटील, वामन हगवणे, भागवत तिवडे, मनोहर उके, राजीव म्हसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील सत्याग्रही जगताप दांपत्याचे कोनांब्याला स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:01 AM
नाशिक : सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील रघुनाथ व ताईबाई जगताप या दांपत्याचे स्मारक सिन्नर तालुक्यातील कोनांबे या त्यांच्या मूळगावी साकारण्यात आले.
ठळक मुद्देडॉ. आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद एक हजार नागरिक सत्याग्रहींनी नावे