कळवण : प्रधानमंत्री आवास, शबरी आवास व रमाई आवास योजनेंतर्गत कळवण तालुक्यात सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत सर्वाधिक वेगाने २५२३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सर्वसामान्यांचचे घराचे स्वप्न पूर्णत्वास आणण्यात कळवण पंचायत समितीला यश आल्याने घरकुल कामात कळवण तालुका राज्यात अव्वल असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती जगन साबळे व उपसभापती सौ पल्लवी देवरे यांनी दिली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्टय ठरविण्यात आले असून सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी कालबद्ध कार्यक्र म राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पाशर््वभूमीवर कळवण पंचायत समितीअंतर्गत गेल्या दोन वर्षात २५२३ घरे पूर्ण करण्यात आली असल्याने कळवण तालुका राज्यात अव्वल ठरला आहे. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. ४ टप्प्यापर्यंत दीड लाख रु पयापर्यंतचे अनुदान लाभार्थ्याला दिले जाते. या अनुदानातून शौचालयासह घरकुलाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे.कळवण तालुक्यात सन २०१६-१७ वर्षात पंतप्रधान आवास योजनेतर्गत १२१३ , शबरी आवास अंतर्गत ३२५ तर रमाई आवास अंतर्गत ४७ घरे पूर्ण करण्यात आली आहे. २०१७-१८ यावर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ९३८ घरे पूर्ण केल्याने गेल्या दोन वर्षात सर्वात वेगाने कामे झालेली आहेत. २०१९-२० या वर्षासाठी कळवण पंचायत समितीला ३१४९ घरांचे उद्दिष्टय दिले असून ३०८४ लाभार्थीना मान्यता मिळाली आहे.
घरकुल बांधकामात कळवण तालुका राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 5:31 PM
दोन वर्षांत २५२३ घरे पूर्ण : तालुक्याला ४३०० घरांचे उद्दिष्टय
ठळक मुद्देदारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते.