नाशिक : कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केल्यानंतर या नाट्यगृहाकडील हौशी रंगकर्मींचा तसेच व्यावसायिकांचा कल वाढून उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षातील चित्र उलटेच असून नूतनीकरणानंतर वर्षभरात नाट्यगृहाच्या उत्पन्नात तब्बल २० लाख रुपये घटल्याचेच दिसून येत आहे.नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाचा मानबिंदू असलेल्या महाकवी कालिदास नाट्यमंदिराच्या नूतनीकरणाला येत्या १५ आॅगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कालिदासच्या वर्षभरातील कामगिरीचा धांडोळा घेण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. एकीकडे दर वाढवल्याबाबतची हौशी आणि व्यावसायिक आयोजकांची नाराजी तर दुसरीकडे उत्पन्नातील घट असे व्यस्त समीकरण दिसून येत आहे.कालिदासचे नूतनीकरण केल्यानंतर कालिदासच्या नियमावलीतदेखील मोठे बदल करण्यात आले. या बदलांमुळे कालिदासवर होणाऱ्या व्यावसायिक, हौशी नाटकांच्या संख्येवरदेखील प्रतिकूल परिणाम झाला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्याच्या अनेक बाजू असल्या तरी ठळकपणे जाणवणारी बाब ही नियमावलीत असलेल्या त्रुटींचा काहीजण फायदा उठवत असून, त्याचा फटका कालिदास नाट्यमंदिराच्या उत्पन्नाला बसत आहे. त्यामुळेच गत सात वर्षांपासून ७५ ते ८५ लाखांच्या दरम्यान असलेले कालिदास नाट्यगृहाचे उत्पन्न यंदा २० लाखांनी घटले आहे. गतवर्षी १५ आॅगस्टला नूतनीकृत कालिदासचा शुभारंभ झाल्यानंतर यंदाच्या १४ आॅगस्टपर्यंतचे उत्पन्न ६२ लाखच झाले आहे. सरासरी विचार केल्यास सुमारे २० लाखांचा फटका यंदा नूतनीकृत कालिदासच्या उत्पन्नात बसला आहे. त्यामुळे नाशिकची सांस्कृतिक प्रतिमा पूर्ण राज्यात पोहोचवणाºया नाट्यमंदिराचे उत्पन्नवाढीचे उपाय करतानाच हौशी आणि व्यावसायिक नाट्यचळवळीला त्याचा फटका बसू नये, अशाप्रकारे नियमावलीत काही फेरबदल करणे अपेक्षित असल्याचे नाट्यकर्मींचे मत आहे.उत्पन्नाची गत ७ वर्षांमधील वर्षनिहाय आकडेवारी२०१२-२०१३ - ७९ लाख १७ हजार ५००२०१३-२०१४ - ७३ लाख ४ हजार २८९२०१४-२०१५ - ८५ लाख ३४ हजार ५६५२०१५-२०१६ - ७८ लाख ७७ हजार ९५०२०१६ -२०१७ - ७७ लाख ८८ हजार १७५२०१७ -२०१८- २० लाख २७ हजार ४६० ( नूतनीकरण दुरुस्तीसाठी नऊ महिने बंद)२०१८ आॅगस्ट ते २०१९ आॅगस्ट- ६२ लाख४७ हजार १८२
‘कालिदास’च्या उत्पन्नात झाली तब्बल २० लाखांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:26 AM