शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
2
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
3
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
4
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
5
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
6
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
7
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
8
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
9
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
10
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
11
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
12
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
13
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
14
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
15
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
16
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
17
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
19
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
20
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'

कालिदास कलामंदिरची तिकीट खिडकी प्रवेशद्वारी

By admin | Published: November 22, 2015 10:56 PM

जानेवारीपासून प्रारंभ : अंतर्गत सुधारणांवरही भर

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरचे रुपडे बदलण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन तत्पर झाले असतानाच गेल्या काही वर्षांपासूनच तिकीट खिडकीबाबतचा सुरू असलेला वादही शमविण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. त्यानुसार जानेवारी २०१६ पासून तिकीट खिडकी हलवून ती प्रवेशद्वारावरील जागेत नेण्यात येणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबाबत अभिनेता भरत जाधव, प्रशांत दामले यांच्यापासून मोहन जोशींपर्यंत अनेकांनी नाराजी दर्शविल्यानंतर महापालिका प्रशासन जागचे हलले आणि अनेक किरकोळ सुधारणांवर भर देण्यास सुरुवात केली. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी त्यासाठी पुढाकार घेत प्रारंभी मोठ्या प्रमाणावर तक्रारी असलेल्या व्यवस्थापकाची उचलबांगडी केली आणि त्याठिकाणी प्रकाश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय कालिदासमधील व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक आयुक्त वसुधा कुरणावळ यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. दरम्यान, अनेक किरकोळ सुधारणा केल्यानंतर चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात खुर्च्या, रंगरंगोटीसाठी सुमारे ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अद्याप प्रशासनाकडे महासभेचे अंदाजपत्रक आले नसल्याने सदर काम रखडले आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून कालिदासमध्ये असलेल्या तिकीट खिडकीचाही वाद संपुष्टात येणार आहे. कालिदास कलामंदिरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयाच्या जागेतच तिकीट खिडकी आहे. सदर खिडकी हलवून ती काही वर्षांपूर्वी कालिदासच्या प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात आली. परंतु सदर जागेत नाट्यव्यावसायिकांनी जाण्यास नकार दिला. सदर जागा योग्य नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. परंतु, व्यावसायिकांच्या तालावर न नाचता महापालिका प्रशासनाने सदर खिडकी आता प्रवेशद्वाराजवळ नेण्याची तयारी सुरू केली असून, सदर जागेची साफसफाई करून जानेवारीपासून खिडकी नव्या जागेत हलविली जाणार आहे. कॉँग्रेसचे गटनेते तथा नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे उपाध्यक्ष शाहू खैरे यांनीही सदर खिडकी स्थलांतर करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. (प्रतिनिधी)