नाशिक : साडेनऊ कोटी रुपये खर्च करून कायापालट करण्यात आलेल्या स्मार्ट महाकवी कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनावरून सध्या राजकीय पक्ष जोर धरू लागले असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (दि.१३) या कलामंदिरातच खासगी शिक्षण संस्थाचालक आणि त्यापाठोपाठ महापालिका शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांंची बैठक बोलविली आहे. त्यामुळे राजकीय गोटात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. अर्थात, स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांनी उद्घाटनाआधी चाचणी घ्या, असा सल्ला बुधवारीच दिला होता, त्यामुळे आयुक्त स्वत:च या कार्यक्रम घेऊन कालिदासची चाचणी घेणार असल्याचे वृत्त आहे.शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिरात अनेक समस्या होत्या. मात्र, त्या दूर करून त्याचा कायापालट झाला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत जुन्या कामांचे नवनिर्माण करण्यासाठी कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाचे काम करण्यात आले. साडेनऊ कोटी रुपये खर्च करून सज्ज झालेल्या या इमारतीचे उद्घाटन करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कलामंदिराचे उद्घाटन करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी तसे पत्र त्यांना दिले होते. मात्र वणी येथे कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी वेळ नसल्याने मुहूर्त टळला. बुधवारी (दि.११) स्मार्ट सिटीच्या संचालकांनी या कामाची पाहणी केली त्यावेळी शुक्रवारी (दि.१३) कालिदास दिन असल्याने त्या दिवशीच उद्घाटन करण्याची भावना विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली असली तरी आपल्या प्रभागातील हे काम असल्याने आपल्याला विशासात घेऊनच उद्घाटन करावे, अशी मागणी कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केली होती.ही राजकीय स्पर्धा सुरू होत असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिक्षण विभागाला सूचना देऊन शुक्रवारी (दि.१३) सकाळी खासगी शाळांचे अध्यक्ष, सचिव तसेच मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सकाळी ११ वाजता कालिदास कलामंदिर येथे होणार असून, स्वच्छता सैनिकांबाबत आयुक्त संवाद साधणार आहेत. तर दुपारच्या सत्रात दुपारी २ वाजता महापालिकेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कामाठी यांची बैठक घेतली जाणार आहे.उद्घाटन नाही पण..आयुक्त तुकाराम मुंढे कलामंदिराचे उद्घाटन करणार नसले तरी त्याचा शुभारंभाचा कार्यक्रम घेणार आहेत. परंतु त्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांना न बोलविल्याने अस्वस्थता आहे.
कालिदास कलामंदिराची आयुक्तांकडून चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:47 AM
नाशिक : साडेनऊ कोटी रुपये खर्च करून कायापालट करण्यात आलेल्या स्मार्ट महाकवी कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनावरून सध्या राजकीय पक्ष जोर धरू लागले असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (दि.१३) या कलामंदिरातच खासगी शिक्षण संस्थाचालक आणि त्यापाठोपाठ महापालिका शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांंची बैठक बोलविली आहे. त्यामुळे राजकीय गोटात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. अर्थात, स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांनी उद्घाटनाआधी चाचणी घ्या, असा सल्ला बुधवारीच दिला होता, त्यामुळे आयुक्त स्वत:च या कार्यक्रम घेऊन कालिदासची चाचणी घेणार असल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देआज बैठक : राजकीय गोटात अस्वस्थता