शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : यंदा वणवा भडकला नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 3:03 PM

यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही.

ठळक मुद्देअभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये जनजागृतीग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसकृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा

नाशिक : भंडारदरा वनपरिक्षेत्र ते राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत पसरलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात यावर्षी स्थानिक लोकसहभाग आणि लॉकडाउन सुरू असल्याने बाहेरून पर्यटक दाखल न झाल्यामुळे कृत्रिम वनवणव्यांचा भडका फारसा उडाला नाही. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अभयारण्यातील वनक्षेत्र वणव्यापासून अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत झाली.नाशिक वनवृत्तातील वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावतो. वर्षाच्या बारामहिने येथे पर्यटकांचा राबता कायम असतो. यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, सचिन धिंदळे यांनी अभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये फिरून जनजागृती करत वनवणवे रोखण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. वनवणव्यांमुळे होणारी अपरिमित हानी स्थानिक लोकांना पटवून दिली. तसेच कृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो व त्या गुन्ह्यात शिक्षेचे स्वरूपदेखील गंभीर असल्याचे लोकांना समजावून सांगितले. यासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीची मदत घेत ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले. यामुळे स्थानिक आदिवासी गावकऱ्यांनी आपआपल्या शेतात राख भाजताना आवश्यक खबरदारी घेतली. परिणामी अभयारण्य क्षेत्रात जेमतेम पाच ते सहा किरकोळ स्वरूपाच्या वणव्याच्या घटना उन्हाळ्यात घडल्या. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे यंदा भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्रातील अभयारण्य वणव्यांपासून सुरक्षित राहू शकल्याचे पडवळे म्हणाले. प्रत्येक गावागावांमध्ये भेटी देत तेथील लोकांमध्ये वणव्यांपासून होणारे नुकसान याविषयी जागृती करणे, तसेच कृत्रिम वनवे कसे टाळावे, त्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहे, याविषयीचे प्रबोधन करण्यावर वनरक्षक बालिका फुंदे, गोविंदा आडळ, संजय गिते, दत्तु भोये, महेंद्र पाटील, राजेंद्र आहेर आदींनी विशेष भर दिला.

गेल्या वर्षी दीड ते दोन एकर क्षेत्र बाधितमागील वर्षी उन्हाळ्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्यामध्ये सुमारे पंधरा ते वीस ठिकाणी कृत्रिम वनवणव्यांचा भडका उडाला होता. यामुळे अभयारण्याचे सरासरी दोन एकर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी मात्र केवळ चार ते पाच ठिकाणी किरकोळ स्वरूपात वणवा पेटल्याचा दावा भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केला आहे.ग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसजे गाव आपल्या शिवारातील वनक्षेत्र वणव्यापासून सुरक्षित ठेवण्यास यशस्वी होईल, त्या गावाच्या ग्रामपंचायतीला वन्यजीव विभागाकडून ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यामुळे गावकºयांनी अधिक सकारात्मक विचार करत कृत्रिम वणवे रोखण्याचा प्रयत्न केला.

या गावांना आले यशपेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, रतनवाडी, कोलटेंबे, साम्रद, पेरुंगण, घाटघर या गावांमध्ये जनजागृती केली. या गावांनीदेखील ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व ग्रामपंचायतीला सहकार्य करत आपआपल्या हद्दीत वनवणवे लागणार नाही, याची दक्षता घेतली.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागAhmednagarअहमदनगरfireआगenvironmentपर्यावरण