शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

कळवण नगरपंचायतीकडे पाच लाखांची वसुली

By admin | Published: November 13, 2016 11:57 PM

नोटांचा तुटवडा : सप्तशृंगगडावर भाविकांना मोफत अन्नदान

कळवण : येथील नगरपंचायत कार्यालय रद्द झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा सोमवारपर्यंत ( दि. १४) स्वीकार करणार असून, त्यातून नगरपंचायतीची कोणतीही देणी भरू शकता येणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद उत्तम प्रतिसाद मिळला असून, आजअखेर कळवण नगरपंचायतीमध्ये विविध करापोटो पाच लाख रुपयांचा भरणा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या चलनी नोटा दि. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी केंद्र शासनाने राज्य शासनाला दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या चलनी नोटांच्या स्वरूपात नागरिकांकडून करांचा भरणा स्वीकारण्यास अनुमती दिल्याने दि. ११ ते १३ नोव्हेंबरअखेर नगरपंचायत कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधून या संधीचा लाभ घेतला आहे. कळवणकरांनी आपले कर जुन्या चलनी नोटांच्या स्वरु पात भरावे, असे आवाहन कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने आज अखेर पाच लाख रुपयांचा भरणा झाला आहे. याबाबत सोशल मीडिया व शहरातील विविध भागात रिक्षा फिरवून लाउड स्पीकरच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. महानगरपालिका व नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा जुन्या चलनात रोखीने करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने अनुमती दिल्याने १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत त्या स्वीकारल्या जाणार आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात होणारा भरणा हा ना परतावा असणार आहे. नागरिकांना विविध करांचा भरणा करता यावा यासाठी कळवण नगरपंचायतने आवश्यक प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले कर जुन्या चलनात भरावेत, असे आवाहन कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. पटेल यांनी केले आहे.ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून, नागरिकांची अडवणूक न करता कर्मचाऱ्यांनी सौजन्याचे धोरण स्वीकारले आहे. सर्वत्र आर्थिक व्यवहार थंडावलेले असताना कळवण नगरपंचायतच्या तिजोरीत मात्र तासागणिक भर पडत आहे. (वार्ताहर)