कळवण- शिवसेनेच्यावतीने पेट्रोल व डिझेल महागाईची अंत्ययात्रा काढून दुचाकीची प्रेतयात्रा काढण्यात आली. मोटारसायकली रस्त्यावरु न लोटत नेऊन शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरप्रमुख साहेबराव पगार यांनी अंत्ययात्रेत पाणी देणाऱ्यांची भूमिका घेतली. ढोलताश्यांचा गजर करु न प्रशासकीय यंत्रणेने लक्ष वेधून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन करु न पेट्रोल व डिझेल महागाईचा निषेध नोंदवला. केंद्र सरकारच्या महागाई व घोटाळ्यावर जिल्हा समन्वयक कारभारी अहेर यांनी सडाडून टीका केली. नवीन कोर्टापासून बसस्थानकापर्यत तालुकाप्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखालील महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलनात तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, महिलावर्ग ,जनता सहभागी झाली होती. डिझेल , पेट्रोल व गॅस दरवाढ ही सर्वसामान्यच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा भस्मासुर आणि दुष्काळाच्या बाबतीत झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेने कळवण बस स्थानकावर ढोल बजावत आंदोलन करु न कळवण देवळा नाशिक या बस स्थानकाजवळील रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, संभाजी पवार, दशरथ बच्छाव, विनोद भालेराव, पंकज मेणे, विनोद मालपूरे, संजय रौदळ, अजय पगार, चंद्रकांत बूटे, राजू वाघ , शिवसेनेच्या महिला आघाडी संघटक प्रिती मेणे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कळवणला महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:48 PM