राजेंद्र पवार पिंपळगाव (ब.)नाशिकहून माहेरी निघालेली महिला नाशिक-अक्कलकुवा बसमध्ये प्रसूत झाली. नामपूरजवळ शारदा या गावात मोलमजुरी करणारी माई रवि गायकवाड यांचे पहिलेच बाळंतपण. यासाठी त्या गुरुवारी सकाळी माहेरी जाण्यासाठी निघाली मात्र तिला बसमध्ये प्रसूतकळा येऊ लागल्या. ही बाबबसचालक व वाहक यांच्या लक्षात येताच त्यांनी बस थेट पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात आणली. रुग्णालयात डॉ. रेखा सोनवणे, डॉ. अश्विन काकड, कल्पना ठाकरे, गणेश जाधव, डोंगरे मावशी आदिंनी सदर महिलेची योग्य काळजी घेत उपचार सुरू केले. मुलगा झाला व बाळाची आई सुखरूप असल्याचे लक्षात आले. सदर महिलेचा हा नवा जन्म झाला असल्याचे लक्षात येताच या महिलेला साडीचोळी व बाळंतविडा असे सर्व साहित्य देण्यात आले. पिंपळगाव बसवंतचे सराफ व्यावसायिक प्रमोद आहेरराव ज्वेलर्स यांनी पूर्ण बाळंतविडा दिला तर संजय साळुंके, जगन आंबेकर, श्रावण मोरे, नीलेश सोनवणे, प्रदीप जोशी यांनी मदतीची जबाबदारी उचलली.दोन रुग्णालयात नाकारून अखेर बसमध्ये सुखरूप प्रसूती झालेल्या या महिलेला पिंपळगाव बसवंतमध्ये आपले कोणीतरी आहे व समाजात अजूनही माणुुसकीआहे या भावनेने गहिवरून आले. सदर महिलेची आरोग्याची व घरापर्यंतची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. रेखा सोनवणे यांनी दिले. पेपर विक्रेते संजय साळुंके यांच्या मदतीने बस पिंपळगावच्या रुग्णालयात नेली. असहाय्य महिलेला पुत्ररत्न कळवण येथील ग्रामीण रु ग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली असता हृदयविकाराचा त्रास असून, रक्तदाब वाढल्याचे सांगत तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणीही तिला तोच अनुभव आला. यामध्ये दोघांनाही धोका होऊ शकतो, असे सांगत उपचार करण्यासाठी खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयात देण्यात आला. या महिलेबरोबर तिची आई कल्पना काशीनाथ बर्डे व मामी लीलाबाई भागा पवार या दोघी जोडीला होत्या. हातात अवघे पाचशे रुपये. डॉक्टरांनी अंग काढून घेतल्याने त्याही हतबल झाल्या.
नाशिक जिल्हा रुग्णालयाबाहेर रात्र काढून अखेर त्यांनी देवाच्या भरवशावर सटाणा तालुक्यातील सौंदाणे येथे माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. सदर महिलेचे दिवसही पूर्ण झाले होते तसेच दोन रुग्णालयात उपचारासाठी योग्य सहकार्य मिळाले नाही. परिस्थिती हाताशी कोणी पुरु ष जोडीला नाही अशा अवस्थेत या महिला पहाटे नाशिक-अक्कलकुवा गाडीत बसल्या आणि तिच्या माहेरच्या दिशेने रवाना झाल्या. पिंपळगाव बसवंतजवळ कोकणगाव येथील गतिरोधकावर बस गतीमध्ये असल्याने आदळली गेली आणि या महिलेची प्रसूती झाली.