नाशिक : पाच महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यात नाशिक महापालिकेचा स्मार्टसिटी अभियानात समावेश केल्यानंतर अद्याप कंपनीची पूर्ण व्यवस्था लागलेली नसतानाही केंद्र व राज्य सरकारकडून सन २०१६ - १७ या आर्थिक वर्षातील १३७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. महापालिकेला आता आपल्या २५ टक्के हिस्स्याची ४५ कोटी रुपयांची रक्कम नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या विशेष उद्देश वाहनाच्या बॅँक खात्यात येत्या ३१ मार्चपूर्वी जमा करावी लागणार आहे. त्यामुळे अजून कशात काही नसताना कंपनीच्या खात्यात तब्बल १८२ कोटी रुपयांचे दाम येऊन पडणार आहे. केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१६ रोजी दुसऱ्या टप्प्यात देशभरातील २१ शहरांची नावे स्मार्टसिटी अभियानात घोषित केली. त्यात नाशिकचा ११व्या क्रमांकावर समावेश होता. स्मार्टसिटीत नाशिकचा समावेश झाल्यानंतर सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होऊन नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची स्थापना करण्यात आली.
काम ना धाम; हाती पडले दाम !
By admin | Published: March 05, 2017 1:53 AM