निफाड : निफाड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या करंजगाव गणाच्या सदस्य कमल राजोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मावळते सभापती सोमनाथ पानगव्हाणे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर कमल शहाजी राजोळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१६) रोजी सभापतीपदाच्या निवडीसाठी निफाड पंचायत समितीच्या सदस्यांच्या बैठकीस पंचायत समितीचे उपसभापती गुरुदेव कांदे, सदस्य राजेश पाटील, सपना बागुल, पंडित आहेर, सोमनाथ पानगव्हाणे, रंजना पाटील, संजय शेवाळे, अनुसया जगताप, सुलभा पवार, रत्ना संगमनेरे, सोनाली चारोस्कर, कमल राजोळे आदी सदस्य उपस्थित होते. कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचे ७ सदस्य अनुपस्थित होत.े तर सेनेचे सदस्य शिवाजी सुरासे हे गैरहजर होते.सभापतीपदासाठी कमल राजोळे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी पाटील यांनी जाहीर केले.निवड जाहिर होताच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. नवनिर्वाचित सभापती कमल राजोळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खंडू बोडके यांचे भाषणे झाले.याप्रसंगी सेनेचे जि. प सदस्य,बाळासाहेब क्षीरसागर, तालुका प्रमुख सुधीर कराड, दिलीप मोरे, शहाजी राजोळे, सेनेचे निफाड शहर प्रमुख संजय कुंदे, नगरसेवक अनिल कुंदे, आनंद बिवलकर, देवदत्त कापसे, संदीप जेऊघाले, राजेंद्र राजोळे, भाऊसाहेब कमानकर, रामदास खालकर, शरद कुटे, संदीप टर्ले, श्याम जोंधळे, सुरेश खैरनार, आरिफ मणियार, विक्र म रंधवे, आदी उपस्थित होते.
निफाड पंचायत समितीच्या सभापतीपदी सेनेच्या कमल राजोळे यांची बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 7:16 PM
निफाड : निफाड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या करंजगाव गणाच्या सदस्य कमल राजोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ठळक मुद्देकॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचे ७ सदस्य अनुपस्थित