सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमलबाई चांगदेव कासार तर उपसरपंचपदी अॅड. शरद कोंडाजी चतूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मिठसागरेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी सरपंच अॅड. शरद चतूर, दादापाटील कासार, शामराव कासार, वसंत कासार, अरुण चतूर यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीराम ग्रामविकास पॅनलने सात जागा जिंकल्या होत्या. सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव होते. निवडणूक निर्णय अधिकारी तुषार राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक अमोल सोनवणे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक पार पडली. त्यात सरपंचपदासाठी कमलबाई कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून अजय वाघ यांनी स्वाक्षरी केली होती. तर उपसरपंचपदासाठी अॅड. शरद चतूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून स्वप्नील चतूर यांनी स्वाक्षरी केली होती. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कासार, नंदा चतुर सुरेखा कथले, प्रदीप तनपुरे आणि रोहिणी कासार आदी उपस्थित होते. यावेळी संदीप कासार, श्यामराव कासार, भगवान चतुर, कैलास कासार, संजय चतुर, नवनाथ चतुर, गुलाब कथले, वसंत कासार, रवी जाधव, दादा तनपुरे, चंद्रभान कासार, विक्रम जाधव, संदीप कथले, बाबासाहेब कासार, पुरुषोत्तम कासार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------
मिठसागरेच्या सरपंचपदी कमलबाई कासार, तर उपसरपंचपदी अॅड. शरद चतूर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना अजय वाघ, स्वप्नील चतूर, दादापाटील कासार, उर्मिला कासार, नंदा चतुर, सुरेखा कथले यांच्यासह कार्यकर्ते. (०६ मिठसागरे)
===Photopath===
060321\06nsk_20_06032021_13.jpg
===Caption===
०६ मिठसागरे