शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कामायनी, पवनला लवकर लासलगावी थांबा

By admin | Published: August 21, 2016 10:16 PM

आश्वासन : चव्हाण यांचे राज्यमंत्र्यांना निवेदन

लासलगाव : लासलगाव रेल्वेस्थानकावर कामायनी व पवन एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या समवेत चर्चा करून तातडीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय रेल्वे व संचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी नाशिकरोड येथे रविवारी दुपारी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या समवेत लासलगावचे ग्रामपंचायत सदस्य डी. के. जगताप व शिवा सुरासे यांनी भेट घेऊन निवेदन सादर केल्यावर दिले.खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लासलगाव येथील रेल्वे थांबा मिळावा यासाठी होत असलेल्या पाठपुराव्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, अशी माहिती मंत्री मनोज सिन्हा यांना दिली. या निवेदनात लासलगावला या गाड्यांच्या थांब्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. लासलगावहून रेल्वेने ये-जा करणारे विद्यार्थी, व्यापारी व नोकरदार यांचे मोठे प्रमाण आहे. नाशिकहून लासलगावकडे येण्यासाठी दुपारच्या साडेअकरा वाजेच्या पॅसेंजरनंतर सहा तासानंतर सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी आहे. दोन्ही गाड्यांदरम्यान सहा तासांचा अवधी असल्याने व्यापारी व प्रामुख्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. त्यांचे बहुतांशी सकाळी शैक्षणिक तास असल्याने ते दुपारी मोकळे होतात. त्यांच्याकडे प्रवासासाठी रेल्वे पास असल्याने त्यांना रेल्वेस्थानकावर बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे या गाड्यांना थांबा मिळाल्यास त्यांचा वेळ वाचणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)