सोयगाव : माळमाथ्यावरील देवारपाडे येथील कमलेश घुमरे या युवा शेतकऱ्याने तयार केलेल्या कपाशी टोकण यंत्राचे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून बघितले, तसेच कमलेशने ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी मॉडीफाईड केलेला ट्रॅक्टर स्वतः चालवून कमलेशचा गौरव केला.कमलेशने फवारणी यंत्र, टोकण यंत्र व मॉडीफाईड केलेल्या ट्रॅक्टरची सर्व माहिती दिली. याप्रसंगी राहुरी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांची कमलेशच्या कामाविषयी चर्चा केली. कृषी क्षेत्रात कमलेशचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. राज्याला अशा युवा होतकरू शेतकऱ्यांची गरज आहे. कृषी विद्यापीठ नक्कीच याची दखल घेऊन कमलेशला भविष्यात मदत करेल, असा शब्द भुसे यांनी यावेळी दिला. यावेळी कमलेश व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अशोक शिंदे, नानाजी घुमरे, भिकन महाडिक, संभाजी घुमरे, अमोल महाडिक, गंभीर घुमरे, सुनील चिकने, एकनाथ घुमरे, दिलीप चिकने, रामभाऊ चिकने, मोहन मांडोळे, आदी उपस्थित होते.
कमलेश घुमरेचा कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 11:51 PM
सोयगाव : माळमाथ्यावरील देवारपाडे येथील कमलेश घुमरे या युवा शेतकऱ्याने तयार केलेल्या कपाशी टोकण यंत्राचे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून बघितले, तसेच कमलेशने ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी मॉडीफाईड केलेला ट्रॅक्टर स्वतः चालवून कमलेशचा गौरव केला.
ठळक मुद्देराहुरी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांची कमलेशच्या कामाविषयी चर्चा केली.