शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

कनाशीत १६५१, तर अभोण्यात १६०१ रु पये दरकांद्याचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 11:37 PM

कनाशीत १६५१, तर अभोण्यात १६०१ रु पये दरकांद्याचा भाव वधारला

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कनाशी व अभोणा उपआवारात उन्हाळी कांद्याची आवक घटत चालल्याने कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली असून, गुरुवारी (दि. २७) उन्हाळी कांद्याला कनाशीत १६५१ रुपये, तर अभोणा उपआवारात सर्वाधिक १६०१ रुपये भाव मिळाला. कळवण मुख्य आवारात १४२० रुपये सर्वाधिक, तर सरासरी १३५० रु पये भाव राहीला.कळवण बाजार समितीच्या कळवण (नाकोडे) मुख्य आवारात ३३८, कनाशी येथे ६९ व अभोण्यात ४५ वाहनातून १४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करून बाजार समितीत तसेच अभोणा व कनाशी या उपबाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी केले.कळवणसाठी एक कोटी ३८ लाख ५६ हजार रु पयांचे कांदा अनुदान कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या वर्षी (२०१६) जुलै व आॅगस्ट महिन्यात विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे अनुदान मंजूर झाले असून ३०५० कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल शंभर रु पये दरानुसार एक कोटी ३८ लाख ५६ हजार अनुदान शासनाने मंजूर केले असून, हे अनुदान लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी दिली.शासनाने अनुदानाची सर्व रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बँक खात्यावर वर्ग केली असून लवकरच ती रक्कम संबंधित शेतकऱ््यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी उपसभापती डी. एम. गायकवाड, संचालक मनोज शिंदे, सुनील देवरे, साहेबराव पाटील, हरिश्चंद्र पगार, सचिव रवींद्र हिरे आदी उपस्थित होते.कळवण तालुक्यात १२ लाख क्विंटल कांदा कळवण तालुक्यात कांदा लागवडीत वाढ होत असून, सन २०१६-१७ या वर्षीत साधारणपणे तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड करु न हेक्टरी २५० क्विंटल कांदा उत्पादन शेतकरी बांधवांनी काढले आहे. बाजार भावात सातत्याने होणारी घसरण लक्षात घेऊन कळवण या आदिवासी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी नेहमी कांदा साठवून करण्यावर भर दिला आहे. कळवण तालुक्यात ४३२७ कांदा चाळीमध्ये साधारणपणे १२ लाख क्विंटल कांदा साठविण्यात आला आहे. दररोज साधारण दोन ते तीन हजार क्विंटल कांदा पिंपळगाव बसवंत, वणी व उमराणे येथील बाजार समिती आवारात विक्र ीसाठी जाता.