सिडको : खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेच्या दोनदिवसीय उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात वाजत-गाजत मिरवणुकीने करण्यात आली. श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सिडको परिसरात कानबाई मातेची स्थापना करण्यात येऊन गल्ली, चौका-चौकात कानबाई मातेची अहिराणी गाणी ऐकायला मिळत होती. सालाबादप्रमाणे यंदाही श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने उत्तमनगर येथून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. वसंत चौधरी यांच्याकडे स्थापन केलेल्या कानबाई मातेची विधिवत पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक अहिराणी गाणी सादर केली. त्यात मिरवणुकीतील सहभागी आबालवृद्ध व पदाधिकाºयांनीही ठेका धरला. साईबाबानगर, महाकाली चौक, जगताप मळा येथील महालक्ष्मी मंदिर प्रांगणात कानबाई मातेचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नीलेश ठाकरे, छाया देवांग, मुकेश शहाणे, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल मटाले, अरुण वेताळ, भूषण राणे, शंकर पाटील, यशवंत नेरकर, जगन आहिरे, राजू परदेशी, दिलीप देवांग तसेच सार्वजनिक उत्सव समितीचे रवि पाटील, नितीन माळी, रवींद्र पाटील, भगवान पाटील, सुरेश सोनवणे, सुनील भारोटे, चंदन चौधरी आदी सहभागी झाले होते.सिडको परिसरातून शोभायात्राखांदेशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. प्राचिन काळापासून सुरू असलेल्या या उत्सवाची परंपरा नवीन नाशिक परिसरातील श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समिती नाशिक यांनी सुरू केली होती. पारंपरिक कानबाई गीतांच्या ठेक्यावर शोभायात्रा उत्तमनगर-साइबाबानगर-महाकाली चौक परिसरातून जगताप मळा येथील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, शोभायात्रेत कानबाईच्या गीतांवर नगरसेवक छाया देवांग, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, सार्वजनिक उत्सव समितीचे सद्य व नागरिक यांनी ठेका धरला. यावेळी पारंपरिक वाद्य, फुगड्या खेळणाºया महिला, लेझिम पथक आदींच्या सहभागाने मिरवणुकीत रंगत वाढली.
खान्देशवासीयांचे आराध्य दैवत कानबाई मातेची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:26 AM