शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

कळवण तालुक्यातील कांदा युरोपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 10:25 PM

कळवण : भेंडी येथे सर्वसोयी-सुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने या केंद्रातून आता थेट दुबई आणि युरोपमध्ये ३६० मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात उत्पादित केलेला कांदा निर्यात सुविधा केंद्रामुळे सातासमुद्रापार पोहोचला आहे.

ठळक मुद्देअपेडाची मान्यता : भेंडी सुविधा केंद्रातून ३६० मेट्रिक टन कांदा निर्यात

कळवण : भेंडी येथे सर्वसोयी-सुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने या केंद्रातून आता थेट दुबई आणि युरोपमध्ये ३६० मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात उत्पादित केलेला कांदा निर्यात सुविधा केंद्रामुळे सातासमुद्रापार पोहोचला आहे.गेल्या वर्षी हॉलंड येथील मेटा आणि लॅमी समा (लक्ष्मी) या दोन व्यापाऱ्यांनी निर्यात सुविधा केंद्राला भेट देऊन पाहणी करून कळवण तालुक्यातील द्राक्ष अमेरिका, युरोप, हॉलंड व इतर देशांत द्राक्षे, डाळिंब निर्यात करण्याचा मानस व्यक्त केला होता.कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन केला जातो, कांद्याची साठवणूक करून त्याची निर्यात करण्याची सुविधा भेंडी येथील कांदा, द्राक्ष सुविधा केंद्रात आहे. मानूरचे भूमिपुत्र तत्कालीन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक सुनील पवार व कळवण येथील शेतकरी सहकारी संघाच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ पुणे यांच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वसुविधांयुक्त निर्यात सुविधा केंद्र भेंडी येथे कार्यान्वित झाल्याने कसमादे पट्ट्यातील कांदा युरोप व दुबईत जाऊ लागला आहे.भेंडी येथून कंटनेर भरला जातो. दुबईकरिता एका कंटनेरमध्ये ३० मेट्रिक टनप्रमाणे १० कंटनेरमधून ३०० मेट्रिक टन कांदा मुंबईमार्गे जहाजाने सात दिवसात दुबईत पोहचतो. दुबईप्रमाणे युरोपात ६० मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. कळवण व परिसरातील कांदा उत्पादकाना त्याचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कांद्याबरोबर टमाटा, मिरची यांची खरेदी करून परदेशात निर्यात केली जात असल्याची माहिती सद्गुरु एंटरप्राईजेसचे संचालक प्रशांत नारकर व गुरुकृपा एंटरप्राईजेसचे संचालक विश्वपाल मोरे यांनी दिली. कृषी व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक जयेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत नारकर, प्रांजली नारकर, विश्वपाल मोरे, सीताराम बिष्णोई, संतोष भोसले, सांकेतिक जोरे निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करून फायदा करून देत आहे.मशीनमध्ये कांदा टाकून प्रतवारी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी व कळवण बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ यांच्या सहकार्यातून सद्गुरु एंटरप्राईजेस व गुरुकृपा एंटरप्राईजेस १२ ते १५ रु पये प्रमाणे कांद्याची खरेदी करून निर्यातकेंद्रात कांदा प्रत ग्रेडिंग मशीन असल्याने मशीनमध्ये कांदा टाकून त्याची प्रतवारी करण्यात येते. सुविधा केंद्रात ६५०० मेट्रिक टन कांद्याची खरेदी करून साठवणूक क्षमता करण्यात आली आहे, निर्यातीसाठी विशिष्ट पॅकिंग करून सद्गुरु एंटरप्राईजेस व गुरु कृपा एंटरप्राईजेस यांच्या माध्यमातून कांदा परदेशात निर्यात केला जात आहे.