शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पूर्व भागात कांदालागवड जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:20 AM

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जुने सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांंदगिरी, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी या पंचक्रोशीत रब्बी पिकांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. उन्हाळ कांदा लागवड, गहू, हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी काही भागात झाली आहे, तर काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. या भागातील शेतकरी गव्हाच्या पारंपरिक वाणांबरोबरच इतरही सुधारित वाणांना पेरणीसाठी पसंती देतात. मात्र गव्हाच्या बियाणांची कमतरता निर्माण झाल्याने त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे शिवारात अजूनही अवकाळी पावसामुळे बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतात ओल आहे. एकलहरे राखेच्या बंधाºयातील पाण्यामुळेही शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे वावर तयार करताना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. तर काही ठिकाणी उशिरानेच पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे शिवारात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी वाफे पद्धती न वापरता मोठमोठे व लांबलचक बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळ्या पसरून कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. या रोपांची लागवड केली जात असली तरी, सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.मात्र थंडी व धुक्यामुळे मावा, करपा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी कांदापात गोल गुंडाळून कांदा पांढरा पडू लागला आहे. या हवामानाचा द्राक्षबागांनाही फटका बसू लागला असून, द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होऊन मण्यांना तडे जाऊ लागले आहेत. सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याची स्थिती आहे. थंडीमुळे मण्यांना क्रॅँक जाऊन पाण्याचे प्रमाण कमीहोण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.हवामान बदलामुळे रोपे पिवळी पडलीतालुक्याच्या पूर्व भागात कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा