पेठ : कापुर्णे गावातील शाळेच्या मुलांसाठी आपुलकी सामाजिक बहुद्देशीय ग्रुपच्या वतीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून चिमुकल्यांची तहान भागवली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापुर्णे शाळेला एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी विस्तार अधिकारी बी.एम. कळंबे, केंद्रप्रमुख सोमनाथ कांबरे, आपुलकी सामाजिक ग्रुपचे अध्यक्ष खंडेराव डावरे, सचिव शांताराम गायकवाड, सहसचिव आर.डी. शिंदे, उपाध्यक्ष जयवंत राऊत, आबाजी गवळी, राधाकृष्ण गवळी, हेमंत कनोज, कैलास गवळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तू गवळी, पोलीसपाटील अनिल गवळी, गणपत गवळी, जगन गवळी, मधुकर चौधरी, मुख्याध्यापक योगेश मोरे, विनोद महाले, यादव जाधव, हेमंत सातपुते यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कापुर्णेच्या चिमुकल्यांची ‘आपुलकी’ने भागवली तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:38 AM
पेठ : कापुर्णे गावातील शाळेच्या मुलांसाठी आपुलकी सामाजिक बहुद्देशीय ग्रुपच्या वतीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून चिमुकल्यांची तहान भागवली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापुर्णे शाळेला एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली.
ठळक मुद्देएक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित