नाशिक : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी ( दि.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अध्यक्ष करण गायकर यांना अटक केली आहे. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार 16 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मराठा संवाद यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर सोमवेरी (दि.26) नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढण्याचे मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन होते. यातील प्रमु्ख नेत्यांमध्ये नाशिकमधून करण गायकर यांचा पुढाकार असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृृत्त आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांचे नेतृत्व आणि समन्वय करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी प्रतिंबधात्मक कारवाई केली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे पोलिसांनी करण गायकर यांना अटक केली असून उमेश शिंदे, संतोष माळोदे, विजय खर्जुल यांना मुंबई नाका परिसरातून ताब्यात आडगाव पोलीस ठाण्यात नेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोमवारी मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी रवाना होऊ शकले नसून सरकाने पोलिसांच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईथ होणारा धडक मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. विधानभवनावर होणाऱ्या या मोर्चाबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने करण गायकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात संवाद यात्रा काढली होती. या यात्रेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ होता. गायकर यांच्या नेतृत्वाखाली नगरचे कार्यकर्ते मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणार होते. त्यापूर्वीच गायकर यांना यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिकमधून करण गायकर यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 2:06 PM
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी ( दि.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अध्यक्ष करण गायकर यांना अटक केली आहे.
ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सरकारवर आरोप नाशिकमधून समन्वयक करण गायकर यांना अटक