सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने पांगरवाडी येथे एक करंजी लाख-मोलाची हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पांगरवाडी येथील गरजू समाजघटकांना दिवाळीचा फराळ, खाद्यपदार्थ व कपड्यांचे वाटप प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, ग्रामसेवक मच्छिंद्र बनगीर, माजी सरपंच अरुण बोकड, उपसरपंच संजय शिरसाठ, शिपाई बाबूराव शिरसाठ तसेच ग्रामस्थ लताबाई कुवर, मनीषा पिंपळे, मंगल सोनवणे, मीराबाई खेताडे, लहानूबाई भवर, बाळू पवार, किसन खेताडे, भीमा भवर, मारुती कांबळे, दिनकर हांडे, दीपक भवर, लक्ष्मण कुंवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. डी. एम. जाधव यांनी समाजातील गरीब, वंचित व दुर्लक्षित घटकांच्या दृष्टीने एक करंजी लाख मोलाची या उपक्रमाची आवश्यकता स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. रसाळ यांनी मनोगतात दिवाळी सणाचे महत्त्व व बहीणभावाचे नाते विशद केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर. टी. सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश भास्कर, प्रा. एस.जी. भागवत, डॉ. सुरेखा जाधव, प्रा. एस.बी. कर्डक, प्रा. ज्योती खताळे, प्रा. गिरीश गुजराती, प्रा. सी. जे. बर्वे तसेच आप्पा थोरात, हिरे मामा यांनी परिश्रम घेतले. फराळ व कपडे संकलन करण्यामध्ये सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.