शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

करंजखेड गाव झाले चकाचक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 7:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारे स्वच्छ आणि चकाचक रस्ते, गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे, सार्वजनिक पाणवठा व चौकाचौकातील गवताचे निर्मूलन यामुळे पेठ तालुक्यातील करंजखेड गावाचे रूप पालटले आहे.

ठळक मुद्देजनसेवा मंडळाचा उपक्रम : ग्रामसफाईने पालटले रूप

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारे स्वच्छ आणि चकाचक रस्ते, गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे, सार्वजनिक पाणवठा व चौकाचौकातील गवताचे निर्मूलन यामुळे पेठ तालुक्यातील करंजखेड गावाचे रूप पालटले आहे.पेठ सुरगाणा तालुका जनसेवा मंडळाच्या वतीने ग्रामसफाई व स्वच्छता अभियानासमवेत ग्राम सुशोभिकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, यामध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून गावोगावी स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. करंजखेड या अतिदुर्गम गावापासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दररोज सकाळी गावातील ग्रामस्थ व जनसेवा मंडळाचे सदस्य हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करतात. रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले असून, त्यांनाही पट्टे मारण्यात आल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. टप्प्याटप्प्याने ही मोहीम पेठ व सुरगाणा तालुक्यातील गावागावात राबवण्यात येणार असल्याचे जनसेवक कमलेश वाघमारे यांनी सांगितले. याप्रसंगी हनुमंत वाघमारे, कमलेश वाघमारे, मनोहर जाधव, दिलीप महाले, रोहित राऊत, रघुनाथ घोरपडे, कमलाकर गवे, सीताराम घोरपडे, धनाजी लहरे, भाऊराव गवे, पंडित गवे, राहुल शेवरे, कैलास गवे, पंढरीनाथ भडांगे, परसराम मुकणे, विष्णू पवार, जयश्री भडांगे, रोहिणी घोरपडे यांच्यासह करंजखेडचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतroad safetyरस्ते सुरक्षा