कळवण येथे कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निवेदन तहसीलदार बी. ए. कापसे यांना देताना शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, दशरथ बच्छाव, शीतलकुमार अहिरे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : बेळगावातील मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविल्याप्रकरणी कर्नाटक सरकारचा कळवण व इगतपुरी येथे निषेध करण्यात आला.कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, अंबादास जाधव, साहेबराव पगार, कारभारी आहेर, संभाजी पवार, डॉ. दिनेश बागुल, विनोद भालेराव, शीतलकुमार अहिरे, संजय रौंदळ, किशोर पवार, विनोद मालपुरे, अजय पगार, प्रकाश भालेराव, अशोक हारदे उपस्थित होते. इगतपुरीत कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या फोटोचे दहनइगतपुरी शिवसेनेतर्फे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोचे दहन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजय इंदूलकर, समीर यादव, विनोद कुलथे, राजेंद्र इंदूलकर, उमेश शिरोळे, सोमनाथ सद्गुरू, विश्वास व्यवहारे, आकाश खारके, आकाश डावखर, सागर परदेशी, सुरेश भांगरे, त्र्यंबक बिन्नर व नगरसेवक आदी उपस्थित होते.