कोरोनाची साखळी तुटावी यासाठी मागील बारा दिवसांपासून शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते; मात्र तरीदेखील गोविंदनगर येथील सागर स्वीट नावाच्या दुकानातून सर्रासपणे विक्री केली जात असल्याची बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर मुंबईनाका पोलिसांनी मनपाच्या पथकलासोबत घेत धाव घेऊन कारवाई केली. तसेच पुढील दहा दिवसांकरिता हे दुकान 'सील' करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांनी दिली आहे.
एकीकडे लहान विक्रेत्यांवर तसेच रस्त्यांवर हातगाडीमध्ये विक्री करणाऱ्यावर दंडुका चालविला जात असताना मोठ्या विक्रेत्यांना कारवाईतून अभय का? असा सवाल उपस्थित केला जात होता. पोलिसांनी या कारवाईतून आता मोठ्या विक्रेत्यांनासुद्धा नियमांचा भंग करणे भोवणार असल्याचे दाखवून दिले आहे.