शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कासार यांचा ‘स्वराविष्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:00 AM

शब्दसुरांतून ओठांवर रेंगाळणाऱ्या बंदीशी आणि रागदारीच्या बहारदार सादरीकरणाने ज्ञानेश्वर कासार यांची मैफल रंगली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे आठवे पुष्प गुंफण्याचे.

नाशिक : शब्दसुरांतून ओठांवर रेंगाळणाऱ्या बंदीशी आणि रागदारीच्या बहारदार सादरीकरणाने ज्ञानेश्वर कासार यांची मैफल रंगली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे आठवे पुष्प गुंफण्याचे.मैफलीची सुरुवात ‘मियाकी तोडी’ या रागाने केली. अल्हाददायक वातावरण निर्माण करणाºया ‘अब तो मोरे राम’ या बंदीशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. शब्दांची, लयीची नजाकत दर्शवित ‘मै सन लागी’ बंदिश सादर केली. या बंदिशीनंतर ज्ञानेश्वर कासार यांनी आपली रचना सादर केली. ‘कासे कहु मन की बिचरा’तून मनाची अवस्था व्यक्त केल्यानंतर अहिर भैरव रागाचे सादरीकरण झाले. त्यानंतर पं.अविराज तायडे यांची रचना सादर झाली. शब्द होते ‘आवरे अव शाम’. मैफलीचा समारोप पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या अभंगांनी करण्यात आला. अभंग होते ‘सुखाचे जे सुख, चंद्रभागे तटी, पुंडलीका पाठी उभे ठाके’ व ‘अनंता तुला कोण पाहू शके’. डॉ. आशिष रानडे (संवादिनी), रसिक कुलकर्णी (तबला), श्रीपाद घोलप, जागृती नागरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन विनायक रानडे व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. संगीत विषयात डॉक्टररेट पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. आशिष रानडे, नृत्य विषयात डॉक्टररेट मिळाल्याबद्दल डॉ. सुमुखी अथनी, नवी दिल्ली येथील स्वर्ण भारत ट्रस्टतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘नेक्स्ट जनरेशन अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा सन्मान अनुक्र मे सी.एल. कुलकर्णी, डॉ. मनोज शिंपी, पं. अविराज तायडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कलाकारांचा सन्मान पं. जयंत नाईक, श्रीराम तत्त्ववादी, एन. सी. देशपांडे, मोहन उपासनी, कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक