पर्यवेक्षिका संगीता लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या पोषण आहार व महिला मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कसबे सुकेणेच्या सरपंच गीता गोतरणे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, सुहास भार्गवे, सोमनाथ भागवत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, लक्ष्मण पडोळ, पर्यवेक्षिका श्रीमती खैरनार, आरोग्यसेविका आरती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सकस आहार प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. सकस आहार प्रदर्शनात मांडलेल्या पाककृतींची व रांगोळीचे उपस्थित पाहुण्यांनी परीक्षण केले. शेवग्याच्या पाल्याचे वडे, गव्हाचा चिवडा, खोबऱ्याचे लाडू या पाककृतींना व उत्कृष्ट रांगोळींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव पाटील ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, सुहास भार्गवे, सोमनाथ भागवत, लक्ष्मण पडोळ, पर्यवेक्षक श्रीमती खैरनार आरोग्य सेविका आरती मोरे, कविता गोरे, अंगणवाडी कार्यकर्त्या मीरा पडोळ, शोभा वडजे, रेखा चंद्रात्रे, सरपंच गीता ताई गोतरणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आशा कार्यकर्त्या रूपाली शिंदे शोभा कवडे, अंगणवाडी कार्यकर्त्या मीरा पडोळ, शोभा वडजे, रेखा चंद्रात्रे, मदतनीस नंदा सोनवणे, नीलम कराटे आदी उपस्थित होत्या.