शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

काशी एक्स्प्रेसचा थांबा नवीन वेळापत्रकातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 9:20 PM

नांदगांव : रेल्वेच्या नवीन थांब्याची मागणी प्रतीक्षेत असताना, कायम थांबा असलेल्या काशी एक्स्प्रेसचा थांबा रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात नसल्याने नांदगावकरांवर अन्याय होत असल्याची तक्रार खासदार भारती पवार यस्च्याचेकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचे निवेदन : नांदगावकरांमध्ये अन्यायाची भावना

नांदगांव : रेल्वेच्या नवीन थांब्याची मागणी प्रतीक्षेत असताना, कायम थांबा असलेल्या काशी एक्स्प्रेसचा थांबा रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात नसल्याने नांदगावकरांवर अन्याय होत असल्याची तक्रार खासदार भारती पवार यस्च्याचेकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.काशी एक्स्प्रेसचा दर्जा कोविड-१९ यात्रा स्पेशल ट्रेन असा करण्यात आलेला असला तरी नांदगाव रेल्वेस्थानकावर तिला थांबा न देणे ही बाब नांदगावला सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा नमुना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत महानगरी असो की पुणे-भुसावळ एक्स्प्रेस मोठ्या आंदोलनानंतर महानगरीचा थांबा देण्यात आला. त्यासाठी नांदगावकरांना संघर्ष करावा लागला.कोरोना काळातदेखील दुटप्पी भूमिका रेल्वे प्रशासन वरिष्ठ पातळीवरून घेत आहे. नांदगाव स्थानकावर नियमित जेमतेम १० रेल्वे प्रवासी गाडीचा थांबा आहे. कोविडमुळे ०६ रेल्वे प्रवासी गाड्या सुरू आहेत व ४ बंद आहेत सुरू असलेल्यांपैकी ०५ गाड्यांना थांबा आहे. काशी एक्सप्रेस सण/उत्सवात स्पेशल गाडी म्हणून चालवली तरी काशी एक्सप्रेसला नांदगावला थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार भारती पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सुमित सोनवणे, तुषार पांडे, दत्तराज छाजेड आदी उपस्थित होते.थांबा देण्याची मागणीकाशी एक्स्प्रेस मात्र थांब्यातून वगळण्यात आले. कोविड काळात ज्या गाड्या सद्य: स्थितीला थांबत आहेत. त्यात डाऊन जनता एक्स्प्रेस पहाटे ३:३० वाजता, महानगरी ४:४५ वाजता, मुंबईकडून महाराष्ट्र पुणेकडून सकाळी ६:१० नंतर कामायनी सांयकाळी ५:३० वाजता तसेच अपला महानगरी एक्स्प्रेस सकाळी ८:४५ वाजता व सायंकाळी कामायनी ५:३० वाजता या वेळापत्रकानुसार अपलाइनला ९ तास व डाउन लाइन १२ तास मुंबईहून नांदगावसाठी एकही गाडी नाही. काशी एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी होत आहे.

 

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेTrafficवाहतूक कोंडी