शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

नृत्यानुष्ठानात कथक नृत्याविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:33 AM

नाशिक : गुरू वास्वती मिश्रा यांच्या शिष्या संगीता चटर्जी यांनी राग बागेश्रीमध्ये सादर केलेल्या कबीरदासजींच्या- मंत्रमुलं गुरू, ध्यान मुलं गुरूमूर्ति या दोह्यांवरील कथक नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली.

ठळक मुद्देनूपुर नृत्य झंकार : पारिजात कथेचे सादरीकरण

नृत्यानुष्ठानच्या अकराव्या पुष्पात कबीरदास यांच्या दोह्यांवर कथक नृत्याविष्कार सादर करताना संगीता चटर्जी.नाशिक : गुरू वास्वती मिश्रा यांच्या शिष्या संगीता चटर्जी यांनी राग बागेश्रीमध्ये सादर केलेल्या कबीरदासजींच्या- मंत्रमुलं गुरू, ध्यान मुलं गुरूमूर्ति या दोह्यांवरील कथक नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात कीर्ती कलामंदिरतर्फे रविवारी (दि.८) नृत्यानुष्ठानचे ११ वे पुष्प तस्मै श्री गुरवे नम: या संकल्पनेच्या नूपुर झंकारातून साकारण्यात आले. संगीता चटर्जी यांनी ताल वसंतमध्ये परंपरेनुसार थाट, आमद, तोडे, तिहाई, तत्कार आदी कलाविष्कारांचे सादरीकरण झाले. अभिनय पक्षात राग मधुवंती व सुगंधमध्ये गुरू बिन कौन बतावे बाट हे भजन प्रस्तुत केले. त्यांना तबला- झाकीर हुसेन वारसी, गायन व संवादिनी - शुहेब हसन यांनी साथसंगत केली.द्वितीय सत्रात मनीषा साठे यांची शिष्य मंजिरी कारु ळकर यांनी ब्रह्मानंदम् परम सुखदं, या गुरु वंदनेने कलाविष्काराने सुरुवात केली. त्यानंतर ताल पक्षात ७ मात्रांचा ताल रूपक पेश करताना गुरूंकडून शिकलेल्या बंदिशींना त्यांनी स्वत:च्या विचारातून दिलेला नवा नृत्याविष्कार सादर केला.दरम्यान, कीर्ती कलामंदिरच्या अदिती पानसे आणि रेखाताई नाडगौडा यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. रेणुका येवलेकर यांच्या निवेदनाने कार्यक्र मात रंगत भरली. प्रारंभी रवि रहाणे आणि बाळकृष्ण तिडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमास रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकdanceनृत्य