खामखेडा : खामखेडा येथे गेल्या दीडशे वर्षांपासून सुरु असलेल्या काठे-कावडीची परंपरा आजही मोठ्या उत्सवात सुरु आहे. चैत्रात महिनाभर चालणाऱ्या उत्सवास मोठ्या थाटात नुकताच प्रारंभ झाला आहे.आजही मोठ्या भक्ती भावाने या उत्सवास लोक सहभागी होत आहेत.काठे-कावडीच्या उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरु वात होते संपूर्ण चैत्र महिन्यातील येणाऱ्या दर सोमवारी रात्री गावातून महादेवाची हि काठे-कावड गावातून मिरवली जाते. कुठलाही खंड पडू न देता खामखेडा येथे परंपरेनुसार दरवर्षी काठी-कावडी उत्सव साजरा केला जातो. चंदनाच्या लाकडापासून हि काठेकावड तयार केली जाते.कावडीच्या मुखांवर नदी महादेवाची चित्र असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी महादेवाच्या कावडीला आंघोळ घालून नवीन कापडाचे ध्वज चढविले जवून विधिवत पूजा केली जाते. व चैत्र महिन्याच्या प्रत्येक सोमवारी हि काठे कावड संपूर्ण गावातून मिरवली जाते.त्यावेळी प्रत्येक घरासमोर हि काठे कावड पूजेसाठी उभी केली जाते. कावडीवर पाणी टाकून काठीवरील नंदीची घरोघरातील महिलांकडून आंघोळ घातली जाउन रोशन, लालकाठी, डफ यांची हि प्रत्येक सुवासीनी व कुटुंब प्रमुखाकडून पूजा घातल्यानंतर काठी कावडी धारकाजवळ भिजून ठेवलेली हरबºयाची डाळ, गुळ प्रसाद म्हणून दिले जाते.काठी कावडी हा उत्सव अनेक पिढीपासून चालत आला आहे. मात्र आजही तो खामखेडावाशियांकडून थाटात साजरा करण्यात येतो. यावेळी डफ हे वाद्य वाजून महादेवाच्या ओव्या म्हटल्या जातात, तर गावात ठिकठिकाणी चौकामध्ये महादेवाची तालासुरातील गाणी म्हटली जातात.खामखेडा येथील कै. धोंडू सुतार, कै. विठ्ठल मोरे यांच्या कुटुंबाकडे काठी कावडी परंपरागत असून उत्सवाची हि प्रथा जोपासली जात आहेत. तर कै. आनंदा शेवाळे यांच्या कुटुंबीयांकडे लाल काठी व निंबा शेवाळे व छोटू शेवाळे व रामदास निंबा शेवाळे यांच्या कुटुंबीयांकडे रोसन हे या उत्सवातील वाद्य आहेत. दर सोमवारी काठीची व या उत्सवातील इतर वस्तूंची पूजा केली जाते. गावातून ही मिरवणुकी राम मंदिराजवळ डाळ, गुळ. खोबºयाचा प्रसाद संपूर्ण गावभर वाटला जातो. जशी खामखेडा गावात महादेवाशी काठी मिरवण्याची प्रथा आहे.
खामखेडा येथे काठे-कावाडी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:58 PM
खामखेडा : खामखेडा येथे गेल्या दीडशे वर्षांपासून सुरु असलेल्या काठे-कावडीची परंपरा आजही मोठ्या उत्सवात सुरु आहे. चैत्रात महिनाभर चालणाऱ्या उत्सवास मोठ्या थाटात नुकताच प्रारंभ झाला आहे.आजही मोठ्या भक्ती भावाने या उत्सवास लोक सहभागी होत आहेत.
ठळक मुद्देखामखेडा गावात महादेवाशी काठी मिरवण्याची प्रथा आहे.