नाशिक : दुचाकी बाजूला घे असे सांगितल्याचा राग येऊन तिघांनी एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी (दि़१५) सायंकाळच्या सुमारास काठे गल्ली परिसरात घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी दोघांसह एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागवानपुरा येथील सिद्धार्थ किसन उन्हवणे (२३) हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास काठे गल्ली परिसरातून दुचाकी काढत होते़ त्यावेळी दुचाकीस अडथळा ठरत असलेली दुचाकी संशयित महेश सुरेश जाधव, सुमीत विष्णू खाणे व एका अल्पवयीनास (तिघेही राहणार बजरंगवाडी, पंचवटी) बाजूला घेण्यास सांगितली़ या गोष्टीचा राग येऊन या तिघांनी उन्हवने यांना बेदम मारहाण करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले़ या प्रकरणी फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
काठे गल्लीत एकावर धारदार शस्त्राने वार
By admin | Published: February 18, 2016 12:06 AM