नाशिक महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट आल्यांनतर पहिल्या पंचवार्षिकमध्ये सर्व विषय समित्या होत्या. मात्र, नंतर कामाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी राज्य शासनाने प्रभाग समित्या सुरू केल्या. महापालिकेने प्रशासकीय कामकाजाच्या सोयीने सहा विभाग करण्यात आले. पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, नाशिकरोड आणि पंचवटी असे सहा विभागांची रचना करून त्यात प्रभाग जोडण्यात आले. अर्थात, असे करताना राजकीय सोयदेखील सुरुवातीला बघितली गेली, मात्र नंतर प्रभाग रचनेनंतरच कोणते प्रभाग कोणत्या विभागात असतील हे स्पष्ट होऊ लागले. त्यातच दर निवडणुकीच्या वेळी प्रभाग रचना बदलली जाऊ लागल्याने त्यानुसार प्रत्येक विभागातील प्रभाग आणि त्याचे भौगाेलिक क्षेत्र यात मात्र तफावत असे. मात्र, अशा स्थितीत गंगापूररोड, कॉलेजरोड, त्र्यंबकरोड तसेच मुंबई नाका ते थेट शहरातील मेनरोडसह तिवंधा हा भाग या पश्चिम प्रभाग समितीत जोडला गेला आहे. त्यामुळे मूळ नाशिककर आणि उच्चभ्रू वसाहत असलेल्या या भागात कौल मात्र वेगवेगळ्या पक्षांना मिळाला आहे.
सध्या एकूण तीन प्रभागातील १२ नगरसेवकांचा या समितीत समावेश आहे. यात शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके, स्वाती भामरे, योगेश हिरे आणि प्रियांका घाटे हे पाच भाजपचे तर शाहू खैरे, वत्सला खैरे, समीर कांबळे आणि डॉ. हेमलता पाटील हे चौघे काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत. शिवसेनेचे अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आणि मनसेच्या ॲड. वैशाली भोसले हे आपल्या पक्षाचे एकेक नगरसेवक निवडून आले आहेत यातही डॉ. हेमलता पाटील या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीतील अखेरच्या वर्षी कॉँग्रेस पक्षाच्या निर्मलाताई कुटे यांच्या नाट्यमय राजीनाम्यामुळे पोटनिवडणुकीत निवडून आल्या मात्र तेव्हापासून त्यांचे सातत्य आहे. शिवाजी गांगुर्डे १९९७ पासून सतत निवडून येत अहोत. शाहू खैरेदेखील त्यांच्या प्रमाणेच १९९७ पासून निवडून येत आहेत. गजानन शेलार पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून निवडून आले, मात्र मध्यंतरी दोन टर्म ते नव्हते. अजय बोरस्ते २००२ पासून सातत्याने निवडून येत असून चार वेळा त्यांनी स्थान टिकवले आहे. वत्सलाताई खैरेदेखील पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीपासून आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे हे १९९२ पासून २०१२ असे सलग निवडून आले आता त्यांच्या कुटुंबातील समीर कांबळे हेदेखील निवडले गेले होते. एकूणच नव्यांना संधी दिली जात असली तरी उत्तम कामगिरी करणाऱ्यांना संधी देणारा पश्चिम प्रभाग आहेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे.
इन्फो...२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपाचे अनेक प्रभागात चारहीच्या चारही सदस्य त्यांच्याच पक्षाचे निवडून आले आहेत. मात्र, पश्चिम विभागात प्रभाग ७ अ मध्ये असेच वातावरण असताना अजय बोरस्ते यांनी बाजू हाणून पाडली.
----
शिवाजी गांगुर्डे, डॉ. हेमलता पाटील, अजय बोरस्ते, शाहू खैरे यांचे फोटो वापरावेत