नांदूरशिंगोटे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता रामदास सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. मावळत्या उपसरपंच रंजना शेळके यांनी सहकारी सदस्यांना संधी देण्यासाठी राजीनामा दिला होता. उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सानप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जावर सूचक म्हणून भारत दराडे यांची स्वाक्षरी होती. सानप यांचा एकमेव अर्ज असल्याने सरपंच शेळके यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य उत्तम बर्के, शरद शेळके उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच कविता सानप व मावळत्या उपसरपंच रंजना शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नांदूरशिंगोटेच्या उपसरपंचपदी कविता सानप बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:35 IST
नांदूरशिंगोटे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता रामदास सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नांदूरशिंगोटेच्या उपसरपंचपदी कविता सानप बिनविरोध
ठळक मुद्देसरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया राबविण्यात आली.