शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

कविताला हवी ‘क्लासवन’ पोस्ट

By admin | Published: November 08, 2016 12:36 AM

निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे

नाशिक : रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना ‘क्लासवन’ पदावर शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, अशी घोषणा करूनही शासनाने वर्ग तीन पदावर आदिवासी विभागात नोकरी दिल्याने कविताने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामध्ये नाशिकच्या कविता राऊतचादेखील समावेश करण्यात येऊन तिला आदिवासी विकास विभागात नोकरी देण्यात आली. मात्र वर्ग तीन पदावर नियुक्ती देण्यात आल्याने कविताने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नियुक्ती देताना शैक्षणिक पात्रतेच्या निकषाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आक्षेपही कविताने नोंदविल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी आॅलिम्पियन खेळाडूंना ‘क्लासवन’ पदावर नियुक्ती दिली जाईल असे यापूर्वीच जाहीर केले असतानाही आपणास वर्ग तीन पदावर नियुक्त करण्यात आले. वास्तविक अन्य एका आॅलिम्पियनला मात्र वर्ग-१ पदावर नियुक्ती देण्यात आली असल्याचेही कविताने निदर्शनास आणून दिले आहे. खेळाडूंना नोकरीमध्ये सामावून घेताना त्यांची शैक्षणिक अट शिथिल करण्यात यावी, असा निकष आहे. कविता पुढील वर्षी पदवीप्राप्त करणार असल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देणे अपेक्षित असल्याचे कविताने म्हटले आहे. कविता सध्या ‘ओएनजीसी’ मध्ये एक्झिक्युटिव्ह एच.आर. या क्लासवन पदावर कार्यरत आहे. योग्य निर्णय होईलशासनाने दिलेली नोकरी म्हणजे हा माझा व इतर खेळाडूंचाही सन्मानच आहे. नियुक्ती देताना शासकीय पातळीवर काही बाबी दुर्लक्षित झाल्या असतील त्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. शासन योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. - कविता राऊत, धावपटू.