शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

काजवा महोत्सव : पर्यटकांच्या धिंगाण्याला लागणार चाप

By admin | Published: May 22, 2017 3:44 PM

नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते.

नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते. पर्यटकांचा धिंगाणा सुरक्षेला तडा देणारा ठरतो. यामुळे या भागात वनविभाग व अकोला पोलीस ठाणेअंतर्गत गस्त वाढविली जाणार असून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशनला संपुर्णपणे आळा घालून हा परिसर पर्यटकांच्या धिंगाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी वनविभाग व वन्यजीव विभाग यावर्षी प्रयत्न करणार आहेत. काजवा महोत्सवाचे ‘ब्रॅन्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा या वृक्षांची संख्या जास्त असून या वृक्षांवर काजव्यांची संख्या जास्त असते. काजवे बिलांमधून बाहेर येऊन रात्रीच्या वेळी झाडांची पाने खातात. त्यामुळे ते चमकताना दिसतात. त्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. यावेळी प्रामाणिकपणे निसर्ग अनुभवणारे व निसर्गासोबत मैत्री जपणारे पर्यटक अपवादानेच येथे येतात. त्यांच्या तुलनेने धिंगाणा घालणारे पर्यटक येथे जास्त येतात. यावेळी वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, साऊंडचा दणदणाट, वाहनांच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लॅस्टिकचा कचरा, दारुच्या रित्या झालेल्या बाटल्या अशा सर्व प्रकाराने निसर्गाची अपरिमित हानी होते. यामुळे काजवा महोत्सव बंद करण्याची खरी गरज असल्याचे मतदेखील काही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. स्थानिक आदिवासींना या काजवा महोत्सवाचा रोजगाराच्या दृष्टीने कवडीचा फायदा होत नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळामार्फत जाणाऱ्या पर्यटकांना वगळले तर कोणतेही पर्यटक जे स्वयंस्फूर्तीने या अभयारण्याच्या परिसरात हजेरी लावतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन किंवा निसर्गाच्या संरक्षणाची काळजी घेतली जात नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.