लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जुन्या नाशकातील शंभर वर्षे जुनी काझीची गढी अत्यंत धोकादायक स्थितीत असून, भविष्यातील जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी या गढीला संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेसच्या सेवादलाने विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडे केली आहे.या संदर्भात शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, काझी गढीच्या प्रश्नाकडे नाशिक महापालिका व जिल्हाधिकाºयांकडे वेळोवेळी निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. काझीची गढी दिवसेंदिवस धोकादायक होत चालली असून, गढीच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे तसेच या रस्त्यावरून अमरधामकडे अंत्ययात्रा जात असतात तसेच पर्यटकांचाही राबता असतो. काही दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने शासनाने या ऐतिहासिक गढीला ज्या पद्धतीने संत गाडगेमहाराज धर्मशाळेला संरक्षक भिंत बांधली त्याच धर्तीवर संपूर्ण गढीला भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काझी गढीला संरक्षक भिंत बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:36 PM